esakal | 'ए. आर. रेहमानला ओळखत नाही' म्हणणारे दाक्षिणात्य अभिनेते बालकृष्ण ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

rehman and balkrishna

'ए. आर. रेहमानला ओळखत नाही' म्हणणारे दाक्षिणात्य अभिनेते बालकृष्ण ट्रोल

sakal_logo
By
स्वाती वेमूल

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते नंदमुरी बालकृष्ण Nandamuri Balakrishna यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या मुलाखतीतील त्यांच्या एका वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं जातंय. संगीतकार ए. आर. रेहमान AR Rahman कोण आहे हे मला माहित नाही, असं ते या व्हिडीओत म्हणताना दिसत आहेत. यावरूनच रेहमानच्या चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, 'रेहमान कोण आहे हे मला माहित नाही. त्याच्याशी मला काही घेणंदेणं नाही. दशकातून एकदा तो एखादं हिट गाणं तयार करतो आणि त्याला ऑस्कर पुरस्कार मिळतो.' (Nandamuri Balakrishna says he does not know AR Rahman fans roast him slv92)

बालकृष्ण यांच्या या वक्तव्यामुळे रेहमानचे चाहते आणि नेटकरी नाराज झाले आहेत. जगभरात लोकप्रिय असलेल्या संगीतकाराला न ओळखणं ही खेदाची बाब आहे, असं एकाने म्हटलं. तर बालकृष्ण यांना अहंकार असल्याची टीका दुसऱ्याने केली. विशेष म्हणजे १९९३ मध्ये ए. आर. रेहमानने बालकृष्ण यांच्या 'निप्पू रव्वा' या तेलुगू चित्रपटासाठी पार्श्वसंगीत दिलं होतं.

हेही वाचा: राज कुंद्रा प्रकरणात आरोपी म्हणून वापरला अभिनेता उमेश कामतचा फोटो

बालकृष्ण सध्या 'अखंड' या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहेत. बोयापती श्रीनू या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने श्रीनू आणि बालकृष्ण हे तिसऱ्यांदा एकत्र काम करत आहेत. यामध्ये बालकृष्ण यांच्या दुहेरी भूमिका आहेत.

loading image