प्रियांकाच्या रिसेप्शनला मोदींची हजेरी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 डिसेंबर 2018

नवी दिल्ली - अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि अमेरिकन गायक निक जोनास अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. हिंदू पद्धतीबरोबरच त्यांचे ख्रिश्चन पद्धतीने देखील लग्न झाले. प्रियांकाच्या मेहंदी पासून ते विवाहाच्या प्रत्येक लूक बद्दल सध्या सोशल मिडियावर चर्चा आहे. त्यातच तिने ख्रिच्शन पद्धतीने लग्न करताना परिधान केलेल्या ड्रेसचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  

Once upon a fairytale... @nickjonas Link in bio @people

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

दरम्यान, काल (मंगळावर) दिल्लीतील ताज महल पॅलेस हॉटेलमध्ये प्रियांका-निकचे रिसेप्शन पार पडले. रिसेप्शनसाठी कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळींसहित अनेक सेलिब्रेटी आणि महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश होता. रिसेप्शनला पंतप्रधानांनी हजेरी लावत प्रियांका आणि निकला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. 

रिसेप्शनला प्रियांका सिल्व्हर कलरच्या घागऱ्यामध्ये दिसली. तर निक ब्लू वेलवेट लूकमध्ये होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narendra modi at Priyanka chopra's reception