esakal | 'नाझी जर्मनीत हेच व्हायचं'; सरकारी प्रचाराच्या चित्रपटांवर नसीरुद्दीन शाहांचं परखड मत
sakal

बोलून बातमी शोधा

naseeruddin-shah

'नाझी जर्मनीत हेच व्हायचं'; सरकारी प्रचाराच्या चित्रपटांवर नसीरुद्दीन शाहांचं परखड मत

sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नसीरुद्दीन शाह Naseeruddin Shah हे इंडस्ट्रीतील अशा कलाकारांपैकी एक आहेत जे कोणत्याही मुद्द्यावर आपले स्पष्ट मत व्यक्त करण्यास मागे हटत नाहीत. चित्रपटांशी संबंधित कोणत्याही सामाजिक, राजकीय आणि गंभीर मुद्द्यांवर ते स्पष्ट मत व्यक्त करतात. असं असलं तरी बऱ्याच वेळा त्यांच्या वक्तव्यांवरून वाद होतात. "काही मोठ्या बजेटचे चित्रपट propaganda films त्यांचा अजेंडा लपवू शकत नाहीत. सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे या चित्रपट निर्मात्यांनी सरकारकडून असे चित्रपट बनवण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं", असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

सरकारवर साधला निशाणा

'एनडीटीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "चित्रपट निर्मात्यांना 'सरकार समर्थक चित्रपट' बनवण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. अशा चित्रपटांसाठी त्यांना आर्थिक मदत केली जात आहे. त्यांनी असे चित्रपट बनवले तर त्यांना क्लीन चिटचे आश्वासनही दिले जातात. नाझी जर्मनीमध्येही nazi germany हा प्रयत्न करण्यात आला होता. उत्कृष्ट, जागतिक दर्जाचे चित्रपट बनवणाऱ्या निर्मात्यांना त्यांनी नाझी तत्त्वज्ञानाचा प्रचार करणारे चित्रपट बनवण्यास सांगितले. बॉलिवूडमधले काही बिग बजेट चित्रपटसुद्धा त्यांचा असा अजेंडा लपवू शकत नाहीत."

"इंडस्ट्रीत पैसा हाच देव"

"मला माहित नाही की फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुस्लिम समुदायाविरुद्ध भेदभाव केला जात आहे की नाही. मला वाटतं की आमचंही योगदान महत्वाचं आहे. या इंडस्ट्रीत पैसा हाच देव आहे. तुमचे पैसे पाहून या उद्योगात तुमचा आदर केला जातो. आजही इंडस्ट्रीत तीन खान सर्वांत लोकप्रिय आहेत. त्यांना आव्हान दिलं जाऊ शकत नाही. मला इंडस्ट्रीत भेदभाव कधीच जाणवला नाही. पण जेव्हा मी करिअरची सुरुवात केली, तेव्हा मला माझं नाव बदलण्याचा सल्ला देण्यात आला होता," असं ते पुढे म्हणाले.

हेही वाचा: ''केबीसी'मध्ये विचारलेला प्रश्न चुकीचा, उत्तरही चुकीचं'; प्रेक्षकाचा दावा

"माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला"

अफगाणिस्तानमधील तालिबानी सत्तेबद्दल नसारुद्दीन शाह यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. त्यावरही त्यांनी या मुलाखतीत भाष्य केलं. "तालिबानबद्दल केवळ भारतातच नाही तर जगात मुस्लिमांच्या विशिष्ट वर्गाकडून केलं जाणारं समर्थन किंवा कथितप्रकारे व्यक्त केला जाणारा आनंद याबद्दलच्या माझ्या विधानाला चुकीच्या पद्धतीने घेतलं गेलं", असं ते म्हणाले.

काय होतं नसीरुद्दीन शाह यांचं वक्तव्य?

"सध्या सगळ्या जगाला अफगाणिस्तानविषयी सहानुभूती आहे. मात्र काही भारतीय मुस्लिम हे त्या तालिबान्यांचे समर्थन करताना दिसत आहे. हे चूकीचं आहे. मला त्यांना विचारायचं आहे की, त्यांना आधुनिक काळाशी सुसंगत असं मुस्लिम तत्वज्ञान हवं आहे की, अराजकीय स्वरुपात सर्वसामान्य व्यक्तीच्या आयुष्याला बेचिराख करुन टाकणारे विचार हवे आहेत. याचा बारकाईनं विचार करण्याची गरज आहे," असं ते म्हणाले होते.

loading image
go to top