esakal | नसीरुद्दीन शाह यांना डिस्चार्ज; मुलाने पोस्ट केले फोटो
sakal

बोलून बातमी शोधा

naseeruddin

नसीरुद्दीन शाह यांना डिस्चार्ज; मुलाने पोस्ट केले फोटो

sakal_logo
By
स्वाती वेमूल

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह Naseeruddin Shah यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. न्यूमोनियावरील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी सकाळी त्यांना डिस्चार्ज मिळताच मुलगा विवानने Vivaan Shah सोशल मीडियावर फोटो पोस्ट केला. ७० वर्षीय नसीरुद्दीन शाह यांना खार येथील रुग्णालयात गेल्या मंगळवारी (२९ जून) दाखल करण्यात आलं होतं. 'घरी परतले' असं कॅप्शन देत विवानने नसीरुद्दीन शाह आणि आई रत्ना पाठक शाह यांचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. (Naseeruddin Shah discharged from hospital son Vivaan shares photos)

'नसीरुद्दीन शाह हे गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहेत. त्यांना न्युमोनिया झाला असून त्यावरील उपचार सुरू आहेत. तपासणीत फुफ्फुसांमध्ये पॅच आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं. त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत', अशी माहिती त्यांच्या मॅनेजरने गेल्या आठवड्यात दिली होती.

हेही वाचा: 'थोडीतरी माणूसकी जपूया'; दिलीप कुमार यांच्या अंत्यविधीनंतर क्रितीची विनंती

नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांना पद्मश्री आणि पद्मभुषण या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०२० मध्ये ते 'बंदिश बँडिट्स' या वेब सीरिजमध्ये झळकले होते. त्यानंतर या वर्षात त्यांचा 'रामप्रसाद की तेरवी' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला. ७० वर्षीय नसीरुद्दीन यांनी अनेक नाटकं, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केलंय.

हेही वाचा: 'कमेंट सेक्शन बंद कर नाहीतर..'; आमिरच्या घटस्फोटानंतर चाहत्यांचा फातिमाला सल्ला

loading image