Naseeruddin Shah : 'दहा वर्षांनी थिएटर नावाची गोष्टच नसेल!' नसिरुद्दीन शहांची भविष्यवाणी

शहा यांची ती भविष्यवाणी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरताना दिसत आहे.यापूर्वी देखील शहा यांनी केलेली वक्तव्यं वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.
Naseeruddin Shah
Naseeruddin Shah

Naseeruddin Shah Taj Divided by blood viral : बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्धीन शहा हे त्यांच्या ताज डिव्हायडेड बाय ब्लडमुळे चर्चेत आले आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही मालिका प्रदर्शित होणार असून त्यावरुन नसिरुद्दीन शहा चर्चेत आले आहेत. त्यांनी भारताचा इतिहास आणि मुघल यावर परखडपणे आपले मत व्यक्त केले आहे.

यानंतर आता नसिरुद्धीन शहा भविष्यामध्ये माध्यमं आणि त्यांची उपयोगिता यावर देखील मतप्रदर्शन केले आहे. शहा यांची ती भविष्यवाणी अनेकांच्या उत्सुकतेचा विषय ठरताना दिसत आहे.यापूर्वी देखील शहा यांनी केलेली वक्तव्यं वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. शहा यांनी सध्याच्या काळात ओटीटीवर ज्या कलाकृती येत आहेत त्यांचा प्रभाव चित्रपटांपेक्षा मोठा आहे. त्यांचा आशय प्रेक्षकांना भावल्याचे दिसून येत आहे.

Also Read - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

ओटीटीवर ज्या कलाकृती येत आहेत त्या महत्वाच्या आहेत. या माध्यमानं आपली उपयोगिता दाखवून दिली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेगानं दुसऱ्या भाषेतील तमिळ, मल्याळम, कन्नड आणि तेलुगू मधील चित्रपट समोर आले आहेत त्याला हिंदीच्या तुलनेत मिळालेला प्रतिसाद मोठा आहे. तेलुगू चित्रपट हे हिंदीपेक्षा अधिक प्रभावी आहेत. हे मान्य करावे लागेल.

गेल्या काही महिन्यांपासून केजीएफ, आरआरआर, पुष्पा द राईज, कांतारा सारख्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. शहा यांनी एक गोष्ट मान्य केली की, साऊथच्या चित्रपटांनी हिंदी चित्रपटांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. आणि प्रेक्षकांचा मिळालेला प्रतिसाद हे खूप काही सांगून जाणारे आहेत. असेही शहा म्हटले आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शहा यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर भाष्य केले आहे.

येत्या काळामध्ये ओटीटीचं स्वरुप आणि त्याचा प्रभाव कसा असेल याविषयी देखील विचार मांडले आहेत. शहा म्हणाले, ओटीटींचा प्रभाव वाढत जाणार आहे. पुढील दहा वर्षात तो विस्तारलेला दिसेल. ओटीटी हे भविष्य असणार आहे. त्यामुळे आणखी दहा वर्षात थिटएर नसेल. अशी भविष्यवाणी शहा यांनी यावेळी केली आहे. मला भीती वाटते ती म्हणजे थिएटर गायब होतील याची.

Naseeruddin Shah
KL Rahul Memes : अण्णाच्या जावयाचा कार्यक्रम कुणी केला? संघातून राहूल 'गूल'

चित्रपट पाहणे हा एक वेगळा अनुभव आहे. मी हे जाणतो, इतक्या वर्षांपासून त्यामध्ये काम करतो आहे. मात्र ओटीटीनं मनोरंजनाची व्याख्याच बदलली आहे. चित्रपटांची संख्या, पैसे आणि मनोरंजन या साऱ्या गोष्टींचा विचार करता त्याची व्यापकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. असेही शहा यांनी यावेळी सांगितले.

Naseeruddin Shah
Akshay Kumar : 'कुणाच्या वाईट दिवसांची थट्टा उडवू नका', एकता कपूरनं अक्षयची केली पाठराखण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com