राहुल देशपांडे यांना पार्श्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर..

मनोरंजन क्षेत्रातील बहूप्रतीक्षित राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे..
national
nationalsakal

68th National Film Awards Winners Live : मनोरंजन क्षेत्रातील अत्यंत मनाचा समजला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर करण्यात आला. कलाकार आणि सिनेसृष्टीतील मंडळी या पुरस्कारची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदाचा ६८ वाराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला होता. कलाकारांना त्यांच्या उत्कृष्ट कामासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

यंदाच्या ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याची माहिती प्रेस इनफॉर्मेशन ब्युरोच्या अधिकृत ट्विटर पेजवरून देण्यात आली आहे. या पुरस्कारांसाठी दरवर्षी हिंदीसह, मराठी, कन्नड, मणिपुरी, पंजाबी, तमिळ, तेलुगू, छत्तीसगढ़ी, हरियाणवी या भाषांसह इतर प्रादेशिक भाषांमधील चित्रपटांना नामांकन दिली जातात.

चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात. यंदाचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा किताब महाराष्ट्राला मिळाला आहे. शास्रीय गायक राहूल देशपांडेला पार्श्वगायनासाठी हा प्राप्त झाला आहे. तर 'अवांचित' आणि 'गोदाकाठ' या दोन मराठी सिनेमांसाठी किशोर कदम यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. नॉन फिचर्स फिल्ममध्ये कुंकूमार्चन या मराठी सिनेमाला पुरस्कार मिळाल आहे.

या पुरस्कारांची सुरुवात १९५४ साली करण्यात आली होती. त्यासाठी जानेवारी १९५३ ते डिसेंबर १९५३ या कालावधीत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची निवड करण्यात आली होती. यावेळी पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ‘शामची आई’ या मराठी चित्रपटाला देण्यात आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com