'नटरंग' मधील प्रसिद्ध अभिनेता करणार होता आत्महत्या;फेसबूक पोस्ट चर्चेत

आज केवळ मराठीत नाही तर बड्या बॉलीवूड स्टार्ससोबत हिंदीतही करतोय काम
Natrang Film Poster
Natrang Film PosterGoogle
Updated on

आज जेव्हा आपण रंगमंचावर वावरणारा आणि नकळत आपल्याला त्याच्या अभिनयानं त्याच्याकडे आकर्षुन घेणारा कलाकार पाहिला की वाटतं,' लक लागतं कलाकार बनायला', सिल्वर स्क्रीन व्यापून टाकाणा-या कलाकाराची मोहिनी आपल्याला म्हणायला भाग पाडते,'लाईफ हो तो ऐसी,सेलिब्रिटी जैसी'. पण हे म्हणणं जितकं सोपं वाटतं तितकाच कलाकार बनण्यापर्यंतचा नव्हे कलाकार म्हणून स्वतःला टिकवून ठेवण्यापर्यंतचा प्रवास खूप कठीण असतो. अभिनय क्षेत्रातलं ते स्ट्रगल ब-याचदा जीवघेणं ठरतं ते तिथे मिळणा-या कामाची शाश्वती नसल्यानं. किंवा आज जर तुम्ही नंबर वन ला आहात किंवा तुमची चलती आहे तर उद्या तुम्ही कधी कामासाठी दरदर भटकताना दिसाल हे सांगता यायचं नाही. आता 'नटरंग'(Natrang) सारख्या सुपरहीट सिनेमातील जर एखादा कलाकार म्हणत असेल की माझ्यावर आत्महत्या करण्याची पाळी आली होती तर मग करायचं काय? कोण आहे तो कलाकार...जाणून घेऊया,चला.

Natrang Film Poster
सलमानला झालेल्या सर्पदंशाचं त्याच्या हिट अॅन्ड रन केसशी कनेक्शन;कसं?

तर त्या कलाकाराचं नाव आहे किशोर कदम(Kishor Kadam),जे 'सौमित्र' म्हणूनही ओळखले जातात. हो, ते उत्तम कवी देखील आहेत,आणि कलाकार म्हणून तर 'बापमाणूस'. तुम्हाला 'गारवा' हा मिलिंद इंगळेंचा अल्बम आठवत असेल तर सौमित्र म्हणजेच किशोर कदमचं नाव ओठावर यायलाच हवं पहिलं. त्यांनी लिहीलेल्या शब्दात भावनांचा शिडकावा होता म्हणून तर मिलिंदच्या आवाजानं आपल्याला शितल गारवा दिला. तर किशोर कदम यांनी 'नटरंग' सिनेमात साकारलेला 'पांडबा' आणि त्याचवेळी प्रदर्शित झालेल्या 'जोगवा' सिनेमातील त्यांनी साकारलेला 'किन्नर' या दोन्ही भूमिका दोन टोकाच्या. पण आपल्या अभिनयानं त्यांनी त्या दोन्ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात खोलवर रुजवल्या. आणि तिथून पुढे किशोर कदम यांनी मागे वळून पाहिलं नाही. मग केवळ मराठीत नाही तर हिंदीतही अक्षय कुमार,अनुपम खेर यांच्या बरोबर काम करून आपलं अस्तित्व तिथेही निर्माण केलं. आज त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी तो काळ सांगितलाय जेव्हा ते काम मिळवण्यासाठी दारोदारी भटकत होते. पण काही अशी माणसं इंडस्ट्रीतली भेटली म्हणून आपली आत्महत्या टळली असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. पुढे त्यांची फेसबूक पोस्ट थोडक्यात देत आहोत. एका कलाकाराची व्यथा डोळ्यात पाणी आणेल एवढं नक्की.

Kishor Kadam
Kishor Kadam Google

Kishor Kadam FB Post

आज विजू माने या माझ्या मित्राची त्याच्या " पांडू " या हिट सिनेमा बद्दलची एक पोस्ट वाचली आणि आम्हा सगळ्याच कलावंताच्या नशिबी एकसारखे भोग का यावेत हा प्रश्न पडला .. म्हणून ...25 सप्टेंबर 2009 ला " जोगवा " रिलीज झाला आणि 1 जानेवारी 2010 ला " नटरंग " रिलीज झाला. खूप वेळ काम नसलेल्या बॅड पॅच नंतर एकामागून एक असे माझे दोन्ही चित्रपट आले आणि दोन्हींतल्या भूमिका पूर्णपणे वेगळ्या होत्या. दोन्ही भूमिकांना रसिक प्रेक्षकांची वाहवा मिळाली आणि दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिकं मिळाली. खूप खुप म्हणजे खूपच "वा ई ट" कालखंडातून मी तेंव्हा जात होतो. त्या आधी शाम बेनेगलांपासून , अनुराग कश्यप पर्यंत आणि दुबेजीं पासून, चंदू कुलकर्णी पासून अतुल पेठे पर्यंत सगळ्या भारी दिग्दर्शकांकडे कामं करूनही मधल्या साताठ वर्षात कुणी कामच देत नव्हतं.... वारंवार आत्महत्येचे विचार मनात यायचे .आणि एक दिवस राजीव पाटीलने मला सिनेमा करतोय म्हणून भेटायला बोलावलं. माझा मित्र संजय कृष्णाजीने ती फिल्म लिहिली होती आणि प्रोड्युसही केली होती.(याची पण एकगोष्ट आहे ..जी नंतर कधी तरी .. मित्र संजय पाटील आणि आम्ही सगळे साक्षीदार .. पण ते नंतर कधीतरी .. तो वर काळ जादूगार ..)आठवत नाही का पण माझ्या बद्दल एक सुप्त खुन्नस राजीवच्या मनात त्या काळात होती .. खरं तर मला तो खूप खूप ज्युनियर पण काळ जादूगार असतो ..मी उत्साहात 'आता राजीव मला मस्स्त व्हिलन किंवा प्रमुख भूमिका देणार' या उत्साहात ( कारण राजीवने त्याच्या सुरवाती पासून माझा सगळा प्रवास पहिला होता ) त्याला भेटायला गेलो.... त्याने म्हटलं तुला " छक्क्यांचा " रोल देतोय मी तुला .. करशील ? " मला गोरेगावच्या तो कॅफे अजून आठवतो .. मी उगाच इकडेतिकडे नजर फिरून पाहिलं ..मी ढासळलो होतो ... आतून खचलो होतो .. ॲक्टरवर कधी काय वेळ येईल .. आणि कोण कसा त्याचा सूड उगवील काही सांगता येत नाही .. Ours is a beggars life .. काहीच काम नव्हतं , काहीच पर्याय नव्हता , काहीच शिल्लक नव्हती म्हणून आणि एका ॲक्टरचा ईगो म्हणून मी तो रोल स्वीकारला .. पहिल्यांदा परकर पोलकं घालतांना खूप लाजिरवाणं , अपमानास्पद आणि हतबल वाटत होतं .. कॉस्ट्यूम करून मेकप करून स्वतःला आरशात पाहिल्यावर स्वतःची किळस वाटली होती .. मी का करतोय ? कुणाला प्रूव्ह करतोय ? उप्याला ? राजीवला ? मुक्ताला ? या नवीन मुलींना ? या आधी मी गेल्या पंधरा सतरा वर्षांत अनेकदा, अनेक पुरस्कारांनी सिद्ध केलंय की ' आय एम या गुड ॲक्टर ' ... मग का ? पळून जावंस वाटत होतं पण मी पळून जाऊ शकलो नाही .. साडी नेसून खाली उतरलो .. साडीतल्या वॅाकची दीडदोनतास प्रॅक्टिस केली .. स्वतः स्वतःचाच बंद खोलीत संवादांचा सूर ऐकला ... पट्टी ठरवली .. संवाद पुन्हा पुन्हा म्हटले ...आणि ... ..."ऍक्शन " ऐकू आल्यावर पहिला डायलॉग म्हटला.

Natrang Film Poster
''हजार चुड़ैल मरी होंगी तब जाके...''राखीच्या तोंडाचा लगाम सुटला...

त्याचवेळी एकदा काम नव्हतं म्हणून मोटरबाइकवर फिरत मी काही गाणी लिहून गुजराण करायचो .. दुपारच्या कडक उन्हात नुक्ताच गोरेगावचा एक सिग्नल क्रॉस केला आणि आठवलं " अरे अजय अतुलचा स्टुडियो इथेच आहे .. त्यांना भेटून एखाद गाणं मिळतंय का बघू .." म्हणून सत्तर अंशात भर ट्रॅफिकमध्ये मोटरबाइक उल्टी फिरवली .. त्यांच्या स्टुडियोखाली गाडी लावली वर जाऊन बेल वाजवली ..अजयने दार उघडलं , समोरच अतुल बसलेला होता .. त्यांचं काही काम चालू होतं ...माझं त्यांनी उत्साहात स्वागत केलं .. चहा पाणी झाला .. मी गाण्याचं काम मागितलं..... " अरे आम्ही सध्या एक तमाशा चित्रपट करतोय .. ये तुला एक नवी लावणी ऐकवतो " म्हणून त्यांनी मला आत नेलं .. आणि " वाजले कि बारा ऐकवलं .." ऐकून मी वेडाच झालो .. " कुणी लिहिलीय ही लावणी ?" " गुरु ठाकूरने " मला गुरुचापुन्हा एकदा पॉझिटिव्ह राग आला ..त्याची स्तुती स्तुती स्तुती करत सुटलो .. लावणी दोनशे टक्के उत्तम झालेली ..मी बडबड करतच होतो .. बोलतच होतो .. आणि अचानक अतुल अजयकडे वळून म्हणाला .. " यार हा पांडबासाठी एकदम फिट आहे ना ? .." ... अजयची क्षणभर माझ्याकडे निरखून पाहत म्हणाला " एकदम कर्र्रेक्टाय् हा .." " मला द्या यार त्या डायरेक्टरचा नम्बर मी स्ट्रगल करतो त्याच्याकडे जाऊन .. मला काम हवंय यार .. कोण आहे तो डायरेक्टर ?” “ रवी जाधव " मी पहिल्यांदा हे नाव त्यांच्या स्टुडिओत ऐकलं .. मी " नंबर दे " चा पिच्छा पुरवत असतानाच अतुलने त्याला फोन लावलाही आणि तो बोलू लागला .." अरे आमच्या समोर आता किशोर कदम उभाय आणि आम्ही त्याला ' वाजले कि बारा ' ऐकवली तो वेडा झालाय .. ते जाऊ दे .. मला वाटतं तो पांडबा साठी …एकदम फिट आहे नाय का ?"

एकाच काळात " जोगवा" तला छक्का आणि " नटरंग " मधला पांडबा लोकांना आवडले होते .. लोक सिनेमा गृहात तुडुंब गर्दी करत होते .. दोन्ही दिनेमे मस्स्त चालले होते .. मी " अपना तो करियर बन गया " च्या थाटात नसलो तरी खूप आनंदात होतो.त्याच दिवसात कुठलं तरी कवी संमेलन संपवून मी रात्री बाराच्या आसपास विरार की वसई मधून परतीची ट्रेंन पकडली होती .. ट्रेन रिकामीच होती ..लोक मोकळेचाकळे बसलेले होते .. मी का कुणासठाऊक झोळी खांद्यावर लावून रिकाम्या मधल्या पॅसेजमध्ये उभा होतो .. कुठल्यातरी स्टेशनवर ट्रेन थांबली आणि एक कुणी पायरेटेड सीडी विकणारा डब्यात चढला .. धक्का देत ट्रेन सुरु झाल्या झाल्या तो हातात रचलेल्या चारपाच सीडीज् जोरजोरात हलवत तो ओरडू लागला...

तो माझ्या समोर आला , मी एक सीडी हातात घेतली .. त्या कशावरच माझा फोटो नव्हता .. पण आतल्या पायरेटेड मध्ये मी असेन कुठेतरी .. खिशात पैसे होते .. वाटलं सगळ्या सिड्या विकत घ्याव्यात आणि फेकून द्याव्यात चालत्या ट्रेन मधून पण एकही सीडी मी विकत घेतली नाही ..मला डब्यातच हुंदका फुटला ... छाती भरून आली .. मोठ्यानं ओरडून त्या सीडी विकणाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बदडावं असं वाटत होतं पण मी तस्साच उभा होतो .. ट्रेन तशीच चालली होती .. खूप रडू येत होतं .. मी रडलो की नाही आठवत नाही.केलेल्या कामाच्या कलावंताने कधीच प्रेमात राहू नये हा धडा त्या रात्री मी शिकलो .. आज विजू मानेच्या " पांडू " सिनेमाची पोस्ट वाचून पुन्हा मी त्या ट्रेनमध्ये चढलो .. ते सगळं पुन्हा आठवलं.. काय करणार ..ये दिल ना होता बेचारा कदम ना होते आवारा तो खूबसूरत कोई अपना...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com