सई ताम्हणकरची मोठी झेप; 'नेटफ्लिक्स'च्या सीरिजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका

ट्रेलर पाहून 'मॅडम काय थांबत नाही', अशी कमेंट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केली.
sai
sai

एकीकडे 'समांतर २' या वेब सीरिजच्या यशाचा आनंद साजरा करतानाच अभिनेत्री सई ताम्हणकरने 'मिमी' या बॉलिवूड चित्रपटाचं सरप्राइज चाहत्यांना दिलं. सईचा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असतानाच आता 'नेटफ्लिक्स' या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'नवरसा' या तमिळ सीरिजमध्ये ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. या तमिळ अँथॉलॉजी सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये नऊ वेगवेगळ्या कथा दाखवण्यात येणार आहेत. त्यातीलच एका कथेत सईची भूमिका आहे. 'नवरसा'च्या ट्रेलरमध्ये सईची झलक पहायला मिळते. (Navarasa trailer marathi actress sai tamhankar role in Netflix Tamil anthology slv92)

मणी रत्नम आणि जयेंद्र पंचपकेसन यांनी मिळून ही सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. विशेष म्हणजे ही सीरिज मानधन न घेता मोफत करणाऱ्या दिग्दर्शक, अभिनेते आणि तंत्रज्ञांची एक टीम या दोघांनी तयार केली. यातून जी काही कमाई होईल, ती लॉकडाउन आणि कोरोना महामारीचा फटका बसलेल्यांच्या मदतीसाठी वापरली जाईल. या सीरिजमध्ये जवळपास ४० दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये सुरिया, विजय सेतुपती, अरविंद स्वामी, सिद्धार्थ, प्रकाश राज, सरवानन, रेवती, नित्या मेनन, पार्वती तिरुवोतू, ऐश्वर्या राजेश यांचा समावेश आहे. याचसोबत ए. आर. रेहमान, डी इमान आणि उत्कृष्ट सिनेमेटॉग्राफर्स या प्रोजेक्टशी जोडले गेले आहेत.

sai
'सांगलीमध्ये बघण्यासारखं काय आहे?' सई ताम्हणकरच्या घराविषयीची पोस्ट चर्चेत

'नवरसा' ही सीरिज येत्या ६ ऑगस्ट रोजी 'नेटफ्लिक्स'वर प्रदर्शित होणार आहे. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ट्रेलर शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांसोबतच अनेक मराठी कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 'मॅडम काय थांबत नाही', अशी कमेंट अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने केली आहे. तर ललित प्रभाकर, संस्कृती गोडबोले, मृण्मयी गोडबोले यांनीसुद्धा कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com