
Navaratri 2022: 'हर हर शंभू' नंतर अभिलिप्साचं 'नव दुर्गे नमो नमः' व्हायरल
Abhilipsa Panda: सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या अभिलिप्सा ही कोण आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. हर हर शंभू या गाण्यामुळे तरुणाईची आवडती गायिका झालेल्या अभिलिप्साला त्या गाण्यानं अमाप लोकप्रियता मिळवून दिली. दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या हर हर शंभुची क्रेझ अद्याप कायम आहे. आता अभिलिप्सा नवरात्रीच्या निमित्तानं एक नवं गाणं घेऊन आली असून त्याला देखील नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळताना दिसतेय.
अभिलिप्साचं नव दुर्गे नमो नम: नेटकऱ्यांच्या भेटीला आलं आहे. ते चाहत्यांना आवडलं आहे. त्या गाण्यामध्ये अभिलिप्सा ही लाल रंगाच्या साडीत दुर्गेची आराधना करताना दिसत आहे. अभिलिप्साचे ते गाणे, तिचे हावभाव हे सारं कमालीचे प्रभावी असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे तिच्या त्या गाण्यावर नेटकऱ्यांच्या असंख्य प्रतिक्रियाही आल्या आहेत. एकानं म्हटलं आहे की, ज्या तन्मयतेने तू हर हर शंभू गायलं होतं. त्याच तल्लीनतेने तू नव दुर्गे नमो नम गायले आहे.
अभिलिप्सा हे तुझं नवं गाणं आम्हाला खूप आवडले आहे. त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. अभिलिप्सानं गायलेलं गाणं हे संदीप कपूरनं लिहिलं आहे. सोशल मीडियावर काही वेळेपूर्वी व्हायरल झालेल्या गाण्याला हजारो व्ह्युज मिळाले आहेत. नेटकऱ्यांनी अभिलिप्सावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. शनिवारी अभिलिप्सानं नव दुर्गेचं एक पोस्टर व्हायरल करुन आपल्या नव्या गाण्याविषयी चाहत्यांना माहिती दिली होती.
हेही वाचा: Amey Wagh: 'जंगलात वाघ एकटाच असतो...' अमेय कुणावर चिडला?
हेही वाचा: Amey Vs Sumeet Raghwan: 'कोण किती पाण्यात बघुच उद्या!' अमेय- सुमितची जुंपली