Navardev Teaser: "शेतकऱ्याला लग्नासाठी मुलगी का मिळत नाही?" 'नवरदेव'चा टिझर रिलीज

'नवरदेव' सिनेमाचा टीझर भेटीला आलाय
navardev marathi movie teaser starring makarand anaspure pravin tarde kshitish date
navardev marathi movie teaser starring makarand anaspure pravin tarde kshitish dateSAKAL

Navardev Teaser: २०२३ वर्ष संपत आलंय. २०२३ मध्ये अनेक मराठी सिनेमांनी प्रेक्षकांचं प्रेम मिळवलं. त्यातील महत्वाचे सिनेमे म्हणजे वाळवी, बाईपण भारी देवा, वेड आणि काहीच दिवसांपुर्वी रिलीज झालेला झिम्मा 2. अशा अनेक सिनेमांनी लोकांचं प्रेम मिळवलंय.

आता २०२४ मध्ये सुद्धा 'पंचक', 'ओले आले' या सिनेमांची लोकांना उत्सुकता आहे. अशातच नवीन वर्षातला आणखी एक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो म्हणजे नवरदेव. आज राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने 'नवरदेव'चा टिझर रिलीज झालाय.

navardev marathi movie teaser starring makarand anaspure pravin tarde kshitish date
Madhurani Prabhulkar: फॅनने दिले असं गिफ्ट की मधुराणी प्रभुलकरच्या डोळ्यात आलं पाणी, व्हिडीओ व्हायरल

'शेतकरी राजा आणि या राजाला न मिळणारी नवरी' या गंभीर प्रश्नावर प्रभावी भाष्य करणारा 'नवरदेव (Bsc Agri.)' हा चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. आज राष्ट्रीय कृषीदिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचा टीजर रिलीज करण्यात आला. हा टिझर हसता हसता गंभीर विषयाकडे बोट ठेवतो.

आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही आज त्याला लग्नासाठी मुलगी मिळणं अवघड झालंय. दिग्दर्शक राम खाटमोडे यांनी अगदी योग्य पद्धतीने या विषयावर भाष्य करत हा विषय किती महत्त्वाचा आहे हे दाखवून दिले आहे.

शेतकरी लग्नाळू तरूणांची कथा सांगणाऱ्या ‘नवरदेव BSc. Agri.’ या चित्रपटाचं टिजर रिलीज झालं आणि प्रेक्षक त्याला उत्तम प्रतिसाद देत आहेत. तर काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या या चित्रपटातील 'भेटणार कधी नवरदेवा नवरी' हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं.

शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणालाही लग्नासाठी कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याची कथा या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे. क्षितीश दाते, प्रविण तरडे, प्रियदर्शिनी इंदलकर, मकरंद अनासपुरे, गार्गी फुले, रमेश परदेशी, हार्दिक जोशी, नेहा शितोळे, संदीप पाठक अशा उत्तम कलाकारांची मांदियाळी या चित्रपटात आपल्याला दिसेल.

आर्यन्स एज्युटेन्मेंट प्रस्तुत, मिलिंद लडगे निर्मित आणि राम खाटमोडे लिखित दिग्दर्शित नवरदेव या चित्रपटाचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक विनोद वणवे हे आहेत, तर विनोद सातव हे क्रिएटीव्ह हेड आहेत. हा चित्रपट २६ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com