Navya Naveli Nanda : 'जर माझ्यामागे बच्चन आडनाव नसतं तर...' अमिताभ यांची नात नव्या काय बोलून गेली?

नव्यानं एका मुलाखतीमध्ये तिच्या नावामागे जे आडनाव (Navya Naveli Nanda news) आहे त्याविषयी तिची प्रतिक्रिया दिली आहे.
Navya Naveli Nanda Latest news
Navya Naveli Nanda Latest newsesakal

Navya Naveli Nanda : बिग बी अमिताभ बच्चन, जया बच्चन यांची नात अन् श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा ही सध्या तिच्या (navya naveli nanda) पॉडकास्टमुळे बऱ्याचदा चर्चेत असते. तिला तिच्या आडनावावरुन (Amitabh jaya bachchan granddaughter) विचारलेला प्रश्न आणि त्यावर तिनं दिलेलं उत्तर यामुळे पुन्हा नव्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मी सध्या ज्या क्षेत्रामध्ये काम करते आहे त्यात मला माझ्या कुटूंबाच्या नावाचा फायदा होतो का असा प्रश्न नेहमीच विचारला जातो. प्रत्येकाच्या नावापुढं त्याच्या कुटूंबाचं नाव येतेच मात्र त्यासोबत येते ती मोठी जबाबदारी याचे भान तुम्हाला असायला हवे. अशा शब्दांत नव्यानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

नव्यानं यावेळी तिला तिच्या कुटूंबाकडून मिळालेला वारसा आणि त्या (Navya latest news) आडनावाचा होणारा फायदा यावर भाष्य केलं आहे. ती म्हणते, मला आई आणि बाबा यांच्या दोन्ही कुटूंबाकडून मोठा वारसा मिळाला आहे. आईकडून बॉलीवूड कल्चरचा तर वडिलांकडून बिझनेसचा. त्यामुळे मला ज्या क्षेत्रात काम करायचे आहे त्यात मला कळत नकळत त्या गोष्टींचा उपयोग होतोच. मी जर अमूक त्या एखाद्या कुटूंबाचा भाग नसते तर माझ्यासाठी त्या गोष्टी तितक्याशा सोप्या नसत्या.

माझे आजी आजोबा यांनी आमच्यासाठी जो मोठा वारसा तयार केला आहे त्याच्याशी मी परिचित आहे. त्यानं कोणत्या प्रकारचे काम केले आहे त्यातून आम्हाला होणारा फायदा मला माहिती आहे. त्यातून माझ्यावर असणाऱ्या जबाबदारीचे ओझे मोठे असल्याची प्रतिक्रिया नव्यानं यावेळी दिली आहे. एबीपीसोबत तिनं साधलेल्या संवादातून नव्याचा तिच्या कुटूंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावेळी दिसून आला आहे.

Navya Naveli Nanda Latest news
Amitabh Bachchan Post : अमिताभ यांची 'ती' पोस्ट राहुल गांधींसाठी तर नाही ना? 'बिग बीं' नी जशास तसं उत्तर दिल्याची होतेय चर्चा!

नव्या आपल्या त्या मुलाखतीमध्ये म्हणते की, मला माहिती आहे की मी कोणत्या परिवारातून आली आहे. त्याचा मला मिळणारा फायदा किती आहे, माझी स्वताची ओळख तयार करताना मला त्याचा होणारा फायदा खूप मोठा आहे. आणि मी ते कबूल करायला हवे. तुमच्या कुटूंबाकडून तुम्हाला मिळालेला जो वारसा आहे तो तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुमच्याकडे देखील कष्ट करण्याची आणि वेगळ्या प्रकारे विचार करण्याची ताकद असावी लागते. असं नव्यानं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com