
Navya Naveli Nanda:'हम तुम एक गाडी मैं, और...' अमिताभ यांच्या नातीचा सिद्धार्थ सोबत व्हिडिओ व्हायरल
Navya Naveli Nanda Boyfriend - बॉलीवूडचे बिग बी शहेनशहा अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा ही तिच्या वेगळ्या स्टाईलसाठी लोकप्रिय आहे. सोशल मीडियावरही ती वेगवेगळ्या कारणासाठी व्हायरल होत असते. आता तिचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे त्यामुळे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
त्याचे झाले असे की, सध्याचा लोकप्रिय अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि नव्या नवेली हे एका पार्टीमध्ये होते. तिथुन बाहेर पडल्यावर एकाच गाडीमध्ये त्यांना पापाराझ्झींनी स्पॉट केले. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन आता वेगवेगळ्या गोष्टींना उधाण आले आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या नवेली नंदा ही तिच्या हटकेपणासाठी ओळखले गेले आहे.
नव्या नवेली आणि सिद्धांतच्या अफेयरची चर्चा आता रंगली आहे. त्या पार्टीनंतर ते एकाच गाडीतून घरी आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नेटकऱ्यांना त्यांच्याविषयी बोलण्यास आयतीच संधी मिळाली आहे. सिद्धांत आणि नव्या हे फिल्ममेकर अमृतपाल सिंह बिंद्रा यांच्या जन्मदिनाच्या पार्टीमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांना स्पॉट केले गेले. काही दिवसांपूर्वी सिद्धांतला पत्रकारांनी त्याच्या अफेयरविषयी सांगितले होते. त्यावेळी त्या गोष्टींबाबत खुलासा करण्यास नकार दिला होता.
हेही वाचा: Viral Video : मराठी लग्न, इंग्रजीत मंगलाष्टके अन् शुभमंगल सावधान!
अजुन तरी त्या दोन्ही सेलिब्रेटींनी आपल्या नात्याविषयी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक माहिती दिलेली नाही. मात्र त्यांच्यातील मैत्री काही लपून राहिलेली नाही. यापूर्वी त्यांना एकत्रितपणे डेटिंग करताना स्पॉट करण्यात आले होते.