Nawazuddin Siddiqui: बाबो...नावाज ला बाईच्या वेशात पाहून नजर हटेना... कसलाच देखणा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui: बाबो...नावाजला बाईच्या वेशात पाहून नजर हटेना... कसलाच देखणा..

बॉलिवूड मधील गंभीर भूमिका करत आपल्या अभिनयाची छाप सोडणारे नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपटामूळं चर्चेत आहे. या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. त्या चित्रपटीचं नावं आहे 'हड्डी'... या चित्रपटाचं पोस्टर समोर आलं तेव्हापासून त्याच्या लूकची चर्चा झाली होती.

त्यातच आता त्याचा अजून एक लूक समोर आला आहे. नवाजुद्दीन त्याच्या इस्टांग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या त्याला पाहिल्यानंतर तूम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. लाल साडीत पुर्ण मेकअपमध्ये नवाजुद्दीन एखाद्या नटीपेक्षा कमी दिसत नाही आहे. त्याचा लूक पाहिल्यानंतर चाहते नक्कीच घायाळ होणार आहेत हे नक्कीच

(Nawazuddin Siddhiqui transgender woman look in haddi)

नवाजुद्दीनने ही पोस्ट शेअर करत त्याला कॅप्शनही तितकच भारी दिलं आहे. फोटो शेअर करत त्यानं लिहिलंय, "गिरफ़्तार तेरी आँखो में हुवे जा रहे हैं हम,जीना नहीं है फिर भी जिये जा रहे हैं हम". फोटोत तो कुणाकडे तरी पाहतांना दिसतोय. त्याच्या नजरेतील अदा चाहत्यांना खुप आवडत आहे.

आधीही त्यानं ग्रीन रंगाची साडी नेसलेला फोटो पोस्ट केला होता. ज्यात माथ्यावर लाल रंगाची बिंदी,डार्क शेडची लिपस्टिक,लांब मोकळ्या केसात अभिनेता कमाल दिसत होता.. त्यानं नाकात चमकी देखील घातलीय अन् गळ्यात नेकलेस घातलेला होता.

'हड्डी' सिनेमातून जेव्हा मेकर्सनी नवाझुद्दीन सिद्दिकीच्या ट्रान्स वुमनचा पहिला लूक शेअर केला होता,तेव्हा प्रत्येकजण पाहून थक्क झाला होता. ग्रे कलरचा शिमरी गाऊन आणि बोल्ड मेकअपमध्ये नवाझुद्दिन सिद्दिकीचा लूक इतका सॉल्लीड वाटत होता की त्याला ओळखणं देखील कठीण होऊन बसलं होतं.'हड्डी' सिनेमात नवाझुद्दीन सिद्दिकीनं तब्बल ८० ट्रान्सजेंडर्ससोबत काम केलं आहे.