Bigg Boss16: अब्दूला शोमधून काढल्यानंतर नेटकऱ्यांचा राडा.. म्हणाले.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Big Boss16
Abdu Rozik

Bigg Boss16: अब्दूला शोमधून काढल्यानंतर नेटकऱ्यांचा राडा.. म्हणाले..

रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' मधील अब्दू रोजिक हा यंदाच्या सिझनचा खास आकर्षण ठरला आहे.त्याने आपल्या निरागसतेने सर्वांची मनं जिंकली. कधी तो घरातील सदस्यांना जादुई आलिंगन देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणत असतो तर कधी त्याच्या मिश्कील स्वभावाने प्रेक्षकांच मनोरंजन करतो.

आपल्या गोंडसपणाने तो प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला. मात्र या संपूर्ण आठवड्यात हसणाऱ्या अब्दूला ज्याप्रकारे धमकावले गेले ते पाहून चाहते दु:खी झाले आहेत. त्यातच अब्दूला घराबाहेर काढलं जाणार आहे. ही बातमी येताच चाहत्यांना धक्का बसला आहे. निर्मात्यांच्या या निर्णयावर चाहते त्याचे खुप संतापले आहे.

गेल्या आठवड्यात अब्दुसोबत घरात अनेक वाइट घटना घडल्या आहेत. ज्यामूळे आधीचं चाहते रागावलेले होते. एमसी स्टॅननेही अब्दुवर ओरडला होता. त्यावेळी अब्दुला रडावेसे वाटले. तसचं अब्दूच्या निरागसतेची खिल्ली उडवली गेली.

निमृतच्या वाढदिवशी साजिदने अब्दूच्या पाठीवर अश्लील मेसेज लिहिला गेला. ही गोष्ट प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही. त्यानंतर #AbduRozik ट्विटरवर ट्रेंड करत होता. आणि आता त्यातच अब्दूच्या हकालपट्टीमुळे चाहत्यांना धक्का बसला आहे.अब्दूला शोमध्ये परत आणले नाही तर तो शो पाहणार नाही असे ते रागाने सांगत आहे.

अब्दूची हकालपट्टी होणार आहे आणि त्यामुळेच तो ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या एविक्शननमुळे जनतेत निर्मात्यांवर नाराजी आहे. तसेच, साजिद, निमृत कौर अहलुवालिया आणि एमसी स्टॅनवरही नेटकरी राग काढत आहे कारण या सर्व लोकांमुळे अब्दूचे मन दुखले आहे.

काही लोक अब्दू रोगिकला शोमधून काढणे हे चुकीचे आहे आणि निर्मात्यांनी त्याला शोमध्ये परत आणण्याचं आवाहन करत आहेत.तर काही लोकांनी अब्दू रोजिकला शोमधून काढून टाकल्यास शो पाहणेच बंद करण्याची धमकी दिली आहे.

एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले, "जर अब्दू परत आला नाही तर आमच्यासाठी बिग बॉस संपला आहे." तर दुसऱ्या यूजरने लिहिले, "अब्दू रोजिकच्या निघून गेल्यानंतर बिग बॉस पूर्वीसारखे राहणार नाही".