
Nawazuddin Siddqui : 'दीड महिन्यांपासून माझी मुलं घरात बंद!' जर बोललो तर...'नवाझुद्दीनचा संताप
Nawazuddin Siddqui bollywood actor share Allia Siddqui : बॉलीवूडचा गणेश गायतोंडे फेम नवाझुद्दीन सिद्धिकीच्या घरातला वाद हा आता चव्हाट्यावर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून तो चर्चेत आला आहे. पहिल्यांदा पत्नी आलियानं त्याच्यावर कौटूंबिक छळाचा आणि त्यानंतर बलात्काराचा आरोप केला. त्यानंतर भावानं देखील नवाझुद्दीनवर गंभीर आरोप केले आहेत.
यासगळ्यात आता नवाझुद्दीनची एक पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामध्ये त्यानं आजवर माझ्याविषयी जे काही बोललं गेलं त्यावर मी काहीच बोललो नाही याचा अर्थ मी चुकलो असे समजू नका.जर का मी सगळे काही सांगितले तर मग तुम्हाला विश्वास बसणार नाही. अशी प्रतिक्रिया नवाझुद्दीननं दिली आहे.
Also Read - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर
नवाझुद्दीन आणि त्याची पत्नी आलिया यांच्यातील वाद हा आता कोर्टापर्यत गेला आहे. अभिनेत्यानं आपल्या दोन्ही मुलांची कस्टडी कोर्टाकडे मागितली होती. त्यानंतर कोर्टानं या दोन्ही सेलिब्रेटींना त्यांच्यातील वाद आपआपसांत सोडविण्यास सांगितले होते. आता नवाझुद्दीनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नवाझुद्दीननं केलेला खुलासा व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यानं म्हटलं आहे की, तिनं मला मुलांना भेटून दिलेलं नाही. आतापर्यत नवाझुद्दीनची टीम सोशल मीडियावरील त्याच्यावरील आरोपांना उत्तरं देत होती.
नवाजनं आता त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, माझं न बोलणं म्हणजे मी चुकलो असा अर्थ काढणे चुकीचे आहे. आतापर्यत बऱ्याच ठिकाणी मला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आले आहे. त्यातून माझ्याविषयी लोकांनी चुकीचे अर्थ काढले आहे. आता त्यांना खरी परिस्थिती काय आहे हे सांगण्याची वेळ आली आहे. माझी मुलं खूप लहान आहेत हो, त्यांच्यासाठी मला काही गोष्टींबाबत शांतता ठेवायची आहे.
मी आणि आलिया आम्ही बऱ्याच दिवसांपासून एकत्र राहत नाही. आमचा घटस्फोट केव्हाच झाला आहे. मात्र मुलांसाठी आम्ही एकत्र राहतो आहोत. तुम्हाला कदाचित एक गोष्ट माहिती नसेल ती म्हणजे माझी मुलं गेल्या ४५ दिवसांपासून मला पत्र लिहून त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून माझ्या मुलांना घरात बंद करुन ठेवलं आहे. आणि ते दुबईमध्ये त्यांच्या शाळेत जाण्यापासून वंचित आहेत.