Houseful 4 : 'हाऊसफुल 4'मध्ये नवाजुद्दीन साकारणार 'ही' भूमिका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 May 2019

  • ‘हाऊसफुल 4’मध्ये नवाजुद्दीनची वर्णी 
  • पाच वर्षानंतर नवाजुद्दीन आणि साजिद नाडियादवाला एकत्र
  • नवाजुद्दीन 'या' गाण्यात झळकणार

बॉलिवूडमध्ये चित्रपट सिरिज ‘हाऊसफुल’ ला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आली आहे. याच सिरिजमधील ‘हाऊसफुल 4’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातअक्षय कुमार, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा डग्गुबत्ती, क्रिती सनॉन, पूजा हेगडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ज्यात आणखी एक नाव सामिल झाल्याचे सरप्राइज चित्रपटाच्या टीमकडून देण्यात आले आहे आणि ते नाव आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. 

या कॉमेडी चित्रपटात नवाजुद्दीन झळकणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवाजुद्दीन मे महिन्याच्या अखेरीस शूटिंगला सुरवात करेल. चित्रपटातील एका गाण्यात तो झळकणार आहे. ‘मुंबई मिरर’ने याविषयी वृत्त दिले. नवाजुद्दीन यामध्ये एका बाबाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातील सहा अभिनेते आणि 500 बॅकग्राऊंड डान्सर्ससोबत नवाजुद्दीन या गाण्यात झळकणार आहे.

या चित्रपटात बॉलिवूडमधील हास्यसम्राट जॉनी लिव्हर आणि त्यांची मुलगी जेमी लिव्हरसुद्धा पाहायला मिळणार आहे. फरहान सामजी चित्रपटाचं दिग्दर्शन करत असून 25 ऑक्टोबर ला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तब्बल पाच वर्षांनंतर नवाजुद्दीन आणि निर्माता साजिद नाडियादवाला एकत्र काम करणार आहेत. याआधी सलमान खान आणि जॅकलिन फर्नांडिस यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘किक’ चित्रपटात त्याने साजिदसोबत काम केलं होतं.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nawazuddin Siddiqui to feature in Akshay Kumars Houseful 4 Film