नवाजुद्दीन सिद्दीकीला पाहून नेटकऱ्यांना आठवली अर्चना पुरण सिंह; ‘हड्डी’मधील फर्स्ट लूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nawazuddin Siddiqui Latest News

Nawazuddin Siddiqui : सिद्दीकीला पाहून नेटकऱ्यांना आठवली अर्चना पुरण सिंह

Nawazuddin Siddiqui Latest News नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) हड्डी चित्रपटाची घोषणा निर्मात्यांनी अतिशय धमाकेदार पद्धतीने केली आहे. चित्रपटाच्या घोषणेसोबतच निर्मात्यांनी चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीची पहिली झलकही शेअर केली आहे. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. मोशन पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ओळखणे जवळपास अशक्य आहे असेच म्हणावे लागेल.

चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) व्यक्तिरेखेबद्दल फारसे काही समोर आलेले नाही. पण, पोस्टर खूपच दमदार आहे. पोस्टरमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी ट्रान्सजेंडर लूकमध्ये गंजलेल्या ठिकाणी पूर्ण मेकअप करून बसलेला दिसत आहे. त्याचे हात रक्ताने माखले असून, रक्ताने माखलेले धारदार शस्त्र त्याने धरले आहे.

हेही वाचा: 'तर मग माझे सिनेमे पाहू नका...'; ट्रोलर्सवर केलेला पलटवार आलिया भट्टला भोवणार

मोशन पोस्टर झी स्टुडिओच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आले आहे. प्रेक्षकांना अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित चित्रपटाबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. पोस्टरसह निर्मात्यांनी सांगितले की चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे आणि तो २०२३ मध्ये प्रदर्शित होईल.

लोकांना अर्चना पुरण सिंह वाटत होती

चित्रपटाच्या पोस्टरला प्रेक्षकांचा प्रतिसाद जोरदार आहे. त्याचवेळी एक मजेदार गोष्ट घडली आहे. अनेक प्रेक्षकांना नवाजुद्दीन सिद्दीकी मेकअपमध्ये अर्चना पुरण सिंह सारखी दिसली आहे. लोकांनी कमेंट करून म्हटले आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकी पहिल्या नजरेत अर्चना पुरण सिंह (Archana Puran Singh) सारखा दिसत होता. पण नवाजचे हे परिवर्तन अप्रतिम आहे असेच म्हणावे लागेल.

Web Title: Nawazuddin Siddiqui Movie Netizens Archana Puran Singh

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..