Nawazuddin Siddiqui: चित्रपट फ्लॉप झाला तरी फरक पडत नाही',शाहरुखचं उदाहरणं देत नवाज म्हणाला... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui: चित्रपट फ्लॉप झाला तरी फरक पडत नाही',शाहरुखचं उदाहरणं देत नवाज म्हणाला...

बॉलिवूडमध्ये अभिनयाच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या आगामी चित्रपट 'हड्डी'.मूळं चर्चेत आहे. या चित्रपटात तो वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरची भूमीका करत आहे.

मात्र सध्या बॉलिवूडच्या चित्रपटांना बॉयकॉटचं ग्रहन लागलं आहे. त्याचंबरोबर चित्रपट सातत्याने बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होत आहे. अशातच नवाजुद्दीनच्या हड्डी हा चित्रपटही लवकरचं प्रदर्शित होणार असल्यानं त्याला याबद्दल विचारलं असंत त्यानं यावर प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा: Nawazuddin Siddiqui: बाबो...नावाजला बाईच्या वेशात पाहून नजर हटेना... कसलाच देखणा..

नवाजुद्दीन सिद्दीकीला अलीकडेच त्याचे चित्रपट फ्लॉप झाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. नवाजुद्दीन म्हणतो की त्याचे चित्रपट फ्लॉप झाल्यावर तो घाबरत नाही. नवाजुद्दीन म्हणाला की तो सतत मेहनत करतो आणि कधीही हार मानत नाही. शाहरुख खानचे उदाहरण देताना नवाजुद्दीनने म्हटले आहे की, शाहरुख ज्याप्रमाणे त्याचे चित्रपट चालत नाहीत तेव्हा नाराज होत नाही, त्याचप्रमाणे तो या गोष्टींवर कधीच नाराज होत नाही.

नवाजुद्दीन अलीकडेच मीडियाशी संवाद साधताना म्हणाला- "पिक्चर चले ना चले, लेकीन नवाजुद्दीन सिद्दीकी तो चलेगा. मी कधीही हार मानत नाही. मी कधीही मेहनत करण्यापासून मागं हटत नाही. तुम्ही तुमचं काम किती प्रामाणिकपणे करता यावरही काही बाबी अवलंबून असतात. काहीवेळा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालत नाही यामागे अनेक कारणं असतात. अनेक वेळा एखादा चित्रपट फ्लॉप झाला की आपण दिग्दर्शकाऐवजी अभिनेत्याला दोष देतो. यावेळी आपण म्हणतो की अभिनेत्यामुळे चित्रपट फ्लॉप झाला. ."

हेही वाचा: Nawazuddin Siddiqui: "अरे ही तर दुसरी अर्चनाच" नवाजुद्दीनचा व्हिडिओ व्हायरल

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी चित्रपटाबद्दल सांगायचं तर तो लवकरच हड्डी या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तिच्याकडे नुरानी चेहरे, टिकू वेड्स शेरू आणि जोगिरा सारा रा रा सारखे प्रोजेक्ट आहेत.

हद्दी या चित्रपटात नवाज पूर्णपणे नवीन आणि वेगळ्या अवतारात दिसणार आहे. या चित्रपटात तो एका ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या व्यक्तिरेखेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी त्याने काही दिवसांपूर्वी ट्रान्सजेंडर लोकांसोबत वेळ घालवला आहे.