Nawazuddin Siddiqui: 'सलमान आणि शाहरुखसोबत काम करणं म्हणजे..', नवाजने सांगितले हैराण करणारे सीक्रेट्स

नवाझुद्दिननं शाहरुख खानसोबत 'रईस' सिनेमात, तर सलमान खान सोबत 'किक' आणि 'बजरंगी भाईजान' मध्ये काम केलं आहे.
Nawazuddin Siddiqui tell difference between work with salman and shahrukh Khan
Nawazuddin Siddiqui tell difference between work with salman and shahrukh KhanGoogle
Updated on

Nawazuddin Siddiqui: नवाझुद्दिन सिद्दिकीनं शाहरुख खान आणि सलमान खान सोबत काम करण्यात नेमका फरक काय आहे यावर काही सीक्रेट गोष्टी शेअर केल्या आहेत. शाहरुख सोबत काम करताना चांगली गोष्ट काय आहे हे सांगतानाच नवाज सलमानची प्रशंसा करायला मात्र विसरलेला नाही. नवाझुद्दिननं शाहरुख खानसोबत 'रईस' सिनेमात काम केलं आहे. तर सलमान खान सोबत त्यानं 'किक' आणि 'बजरंगी भाईजान' मध्ये काम केलं आहे. नवाजनं सलमान आणि शाहरुख सोबत काम करण्याचा अनुभव किती वेगळा आहे याचा खुलासा केला आहे.(Nawazuddin Siddiqui tell difference between work with salman and shahrukh Khan)

Nawazuddin Siddiqui tell difference between work with salman and shahrukh Khan
Ananya Panday: 'हिच्या खांद्यावर पदर टीकेना!' अनन्या OOPS Moment ची शिकार....

नवाझुद्दिन सिद्दिकीनं आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आपली ओळख बनवली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सलमान आणि शाहरुख खान सोबत आपला काम करण्याचा अनुभव कसा राहिला याविषयी त्यानं काही खुलासे केले आहेत. नवाज त्या मुलाखतीत बोलला आहे की,शाहरुख खान सोबत काम करायला मिळालं की खूप वेळा रीहर्सल करण्याची संधी मिळते. जर टीमपैकी कोणालाही वाटलं की एखादा सीन चांगला झालेला नाही तर तो सीन पुन्हा नव्यानं शूट केला जातो.

Nawazuddin Siddiqui tell difference between work with salman and shahrukh Khan
Vidya Balan Video: भर पार्टीत कॅमेऱ्यासमोरच विद्याच्या साडीच्या निऱ्या सुटल्या,पदरानेही दिला दगा...

तर सलमान विषयी सांगताना नवाज म्हणाला,सलमान सोबत काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. तो एक अभिनेता म्हणून इतका चांगला आहे की आपला एखादा चांगला संवाद तो सहज दुसऱ्याला देतो. तो कॅमेऱ्यासमोर सहज सांगतो,'हे घे,हा डायलॉग तू बोल'. सलमान सोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता असं नवाजनं नमूद केलं आहे.

Nawazuddin Siddiqui tell difference between work with salman and shahrukh Khan
Podcast: 'तिला वेळ हवाय..तिनं मला फोन केला, म्हणाली...', रुचिराशी ब्रेकअपच्या बातम्यांवर रोहितचा खुलासा

नवाजुद्दिन सिद्दिकीला इंडस्ट्रीत आपलं स्थान निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला आहे. अनुराग कश्यच्या 'गॅंग्स ऑफ वासेपूर' या सिनेमामुळे नवाजला ओळख मिळाली. त्याचा शेवटचा रिलीज झालेला सिनेमा 'हिरोपंती २' फ्लॉप राहिला होता. त्यावेळी लगेचच एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाज म्हणाला होता,''पिक्चर चले न चले,नवाजुद्दिन तो चलेगा...''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com