
Nawazuddin Siddiqui Case : नवाझुद्दीनला कोर्टाकडून नोटीस! पत्नी आलियाकडून गंभीर आरोप, 'तो मला...'
Nawazuddin Siddiqui Harassment Case: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकीचे काही खरे नाही. तो आता कायद्याच्या कचाट्यात सापडल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नवाझुद्दीन हा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आल्याचे दिसून आले आहे. आता कोर्टानं त्याला नोटीस बजावल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
नवाझुद्दीनच्या पत्नीनं आलियानं त्याच्यावर केलेले आरोप हे आता नवाझुद्दीनसाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. तिनं नवाझुद्दीन आणि त्याची आई यांच्यावर कौटूंबिक हिंसाचाराचे आरोप केले आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या वकिलानं याविषयी माध्यमांना दिलेल्या माहितीनं बॉलीवूडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या सगळ्या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाल्यानंतर कोर्टानं नवाझुद्दीनला नोटीस पाठवली आहे.
Also Read - ...तर जाईल हे वर्ष आर्थिकदृष्ट्या चांगले
आलियाच्या वकीलानं रिजवान सिद्धीकी यांनी सांगितले होते की, अभिनेत्यानं त्याच्या पत्नीला घरातून बाहेर काढण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केला होता. तिच्याशी गैरवर्तन केले. बऱ्याच दिवसांपासून तिला जेवायला देखील दिले नाही. त्यामुळे तिनं त्याच्याविरोधात कोर्टाकडे न्यायासाठी अर्ज केला आहे. एवढेच नाहीतर गेल्या अनेक दिवसांपासून नवाझुद्दीननं त्याच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे दिलेले नाहीत. असेही वकिलांनी यावेळी सांगितले.
आम्हाला पोलिसांकडून कोणत्याही प्रकारे मदत मिळत नसल्यानं आम्ही थेट कोर्टात अर्ज केला आहे. बऱ्याच महिन्यांपासून नवाझुद्दीनच्या घरात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु झाला आहे. त्यानंतर नवाझुद्दीनच्या आईनं देखील तिच्या सुनेविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. आलियाच्या वकीलांचा असा दावा आहे की, नवाझुद्दीनची आई ही आलियाला नवाझुद्दीनची पत्नी मानायला तयार नाही. त्यामुळे हा वाद तयार झाला आहे.
आलियासोबत नवाझुद्दीनचा घटस्फोट झाला आहे. असे नवाझुद्दीनच्या आईचे म्हणणे आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवाझुद्दीनच्या पत्नीचे खरे नाव अंजना किशोर पांडे असे होते लग्नानंतर तिचे नाव आलिया जैनब असे केले.