करण जोहरच्या हाऊस पार्टीच्या व्हिडिओचा NCB पुन्हा करु शकते तपास, कलाकारांची होऊ शकते चौकशी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 2 October 2020

एनसीबीने रिया चक्रवर्तीसोबतंच बॉलीवूडच्या कथित ड्रग पेडलर्सला ताब्यात घेतलं आहे. यातंच मागच्या वर्षी समोर आलेल्या करण जोहरच्या हाऊस पार्टीचा तपास करावा अशी मागणी देखील जोर धरु लागली आहे. 

मुंबई- सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात ड्रग एँगल समोर आल्यानंतर एनसीबीने त्यांचा तपास सुरु केला. या तपासात बॉलीवूडशी संबंधित अनेकजणांचे कथित ड्रग्स चॅट समोर आले आहेत. एनसीबीने रिया चक्रवर्तीसोबतंच बॉलीवूडच्या कथित ड्रग पेडलर्सला ताब्यात घेतलं आहे. यातंच मागच्या वर्षी समोर आलेल्या करण जोहरच्या हाऊस पार्टीचा तपास करावा अशी मागणी देखील जोर धरु लागली आहे. 

हे ही वाचा: सिनेमागृह सुरु होताच बॉलीवूडचा 'हा' सिनेमा होणार सर्वात पहिले रिलीज  

टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, एनीसीबीच्या काही सुत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की एनसीबी करण जोहरच्या हाऊस पार्टीचा व्हिडिओ फॉरेन्सिक तपासासाठी पाठवू  शकतात. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर असे आरोप लावण्यात आले आहेत की त्या पार्टीत उपस्थित असलेल्या सेलिब्रिटींनी ड्रग्सचं सेवन केलं होतं. शिरोमणी अकाली दलचे आमदार मनजिंदर सिंह सिरसा यांनी या हाऊस पार्टीच्या व्हिडिओच्या आधारावर करण जोहर विरुद्ध ड्रग पार्टी आयोजित केल्या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. 

रिपोर्टनुसार, एनसीबी आत्ता या व्हिडिओच्या तपासाबाबत जास्त काही बोलू इच्छित नाही कारण या व्हिडिओमध्ये अनेक बड्या सेलिब्रिटींची नावं जोडली गेली आहेत. या व्हिडिओ आधारावर एनसीबी या सेलिब्रिटींची चौकशी कधी आणि कशाप्रकारे करतील किंवा नाही हे देखील कळू शकलेलं नाही. सोबत असं देखील म्हटलं जात आहे की एनसीबी ईमेल द्वारे किंवा सेलिब्रिटींच्या वकिलांद्वारे त्यांचा जबाब घेऊ शकतात. 

एकीकडे करण जोहरने या प्रकरणावर त्याचं स्टेटमेंट जाहीर करत त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी खोटे आरोप लावले जात आहेत असं म्हटलं होतं तर दुसरीकडे आमदार सिरसा यांनी करण जोहर विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांना पाकिस्तानमधून धमक्यांचे फोने येत असून  त्यांच्यावर एफआयआर परत घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचं म्हटलंय.   

ncb may re examine karan johar house party video  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncb may re examine karan johar house party video