'हे मी सहन करणार नाही'; क्रांती रेडकरने खोटं वृत्त देणाऱ्यांना सुनावलं

'जर मी दोषी असते, तर...'
kranti redkar
kranti redkarfacebook

अभिनेत्री आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे Sameer Wankhede यांची पत्नी क्रांती रेडकर Kranti Redkar हिने ट्विटद्वारे एका वृत्तवेबसाइटला सुनावलं आहे. संबंधित वेबसाइटने त्यांच्या एका बातमीच्या शीर्षकात क्रांतीविषयी चुकीची माहिती दिली. क्रांतीवर आयपीएल मॅच फिक्सिंगचे IPL Fixing आरोप असल्याचं शीर्षक त्यांनी दिलं आहे. क्रांतीने ट्विट करत यावर आक्षेप घेतला आहे. त्याचप्रमाणे संबंधित वेबसाइटला तिने खडेबोल सुनावले आहेत. 'फक्त काही व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही दिशाभूल करणारं शीर्षक दिलं, हे कशासाठी? ? माझी आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी, फक्त पैशांसाठी,' असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

क्रांतीचं ट्विट-

'तुम्ही हे काय करत आहात? फक्त काही व्ह्यूज मिळावे यासाठी तुम्ही दिशाभूल करणारं शीर्षक दिलं, हे कशासाठी? मी आधीच याप्रकरणी कोर्टात खटला लढवला आणि त्यात मी जिंकलेसुद्धा. मी तुम्ही पूर्ण बातमी वाचली, चुकीच्या ओळखीचं प्रकरण त्यात लिहिलं आहे. पण मग हे शीर्षक असं का? माझी आणि समीरची प्रतिमा मलिन करण्यासाठी, फक्त पैशांसाठी?,' अशा शब्दांत क्रांतीने संताप व्यक्त केला.

'प्रत्येकजण पूर्ण बातमी वाचत नाही. तुमच्या निष्काळजी आणि असंवेदनशील लिखाणामुळे लोकं मला ट्रोल करतात. आम्हालाही भावना आहेत, तुमच्या अशा चटपटीत बातम्या आम्ही खपवून घेणार नाही. जर मी दोषी असते, तर मी माझी चूक मान्य केली असती. पण मी दोषी नाही म्हणून मी हे सहन करणार नाही,' असं तिने पुढे लिहिलं.

kranti redkar
"हे तुझं प्रॉडक्शन हाऊस नाही"; अनन्याला समीर वानखेडेंनी फटकारलं

नेमकं काय आहे प्रकरण?

आयपीएल मॅच फिक्सिंग प्रकरणात क्रांतीचं नाव देणाऱ्या एका वृत्तवाहिनीविरोधात तिने मानहानीचा खटला लढवला होता. न्यायालयाने या खटल्यात क्रांतीच्या बाजूने निकाल दिला होता. मात्र क्रांतीवर मॅच फिक्सिंगचे आरोप पुन्हा एकदा केल्याने तिने संबंधित वेबसाइटवर संताप व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com