Aryan Khan: शाहरुखचा मनस्ताप वाढणार? ड्रग्ज प्रकरणी NCB कडून मोठी माहिती

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या चौकशी बाबत एनसीबीने मोठी माहिती उघड केली आहे..
NCB report says Aryan Khan was 'deliberately targeted', several irregularities in probe led to his arrest
NCB report says Aryan Khan was 'deliberately targeted', several irregularities in probe led to his arrestsakal
Updated on

aryan khan: अभिनेता शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान गेली एक वर्ष सातत्याने चर्चेत आहे. विशेष म्हणजे तो कोणत्या चित्रपटामुळे नाही तर ड्रग्ज प्रकरणामुळे. त्यामुळे शाहरुखच्या अडचणीतही मोठी वाढ झाली होती. आता मात्र या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्यti दिल्ली न खान ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने एक मोठी माहिती दिल्ली मुख्यालयाला दिली आहे.

((NCB report says Aryan Khan was 'deliberately targeted', several irregularities in probe led to his arrest))

आर्यन खानला (aryan khan) 2021 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती. तब्बल 26 दिवस तो कोठडीत होता . NCBकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली. दरम्यान काही महिन्यांआधीच आर्यनची या केसमध्ये निर्दोश सुटका करण्यात आली मात्र आता या प्रकरणात NCBकडून मोठी माहिती समोर आली आहे.

NCB report says Aryan Khan was 'deliberately targeted', several irregularities in probe led to his arrest
Bigg Boss Marathi 4: अपूर्वा-प्रसाद मधली ठसन माहीत आहे का? एकेकाळी होते जानी दुश्मन

आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणार नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो म्हणजेचNCBने केलेला खुलासा पाहून सगळेच चकित झाले आहेत. NCBने दिल्ली मुख्यालयात आर्यन खान ड्रग्ज प्रकणार एक अहवाल सादर केला आहे ज्यात या प्रकरणाची चौकशी योग्यरित्या झाली नसल्याचे म्हंटले आहे.

NCB report says Aryan Khan was 'deliberately targeted', several irregularities in probe led to his arrest
Bigg Boss Marathi 4: विकास थंड घे! अपूर्वा नेमळेकर एवढी स्वस्त झालेली नाहीय..

NCBच्या अहवालात म्हंटले आहे की, 'या प्रकरणाची तेव्हाही चौकशी केली जात होती आणि आजही त्यावर काम सुरू आहे. या प्रकरणी अनेक नव्या गोष्टी समोर येत आहेत. या प्रकरणात 7-8 अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे तपास पथकाने त्यांचीही चौकशी सुरू केली आहे. तसेच संशायास्पद अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची परवानगीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळवण्यात आली आहे.

2 ऑक्टोबर 2021च्या रात्री आर्यन खानला NCBने मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझ शिपमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीमध्ये छापेमारी करताना ताब्यात घेतलं होतं. आर्यन खानसह मुनमुन धमेचा, अरबाज मर्चंटसह जवळपास 20 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. NCBकडून आर्यन खानला अटक करण्यात आली त्यानंतर 28 ऑक्टोबरला त्याचा जामीन मंजूर करण्यात आला तर मे 2022 मध्ये त्याला क्लीन चिट देण्यात आली होती. आता या प्रकरणी नेमकी कुणाची चौकशी होणार आणि के सत्य बाहेर येणार ही लवकरच कळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com