Bigg Boss Marathi 4: विकास थंड घे! अपूर्वा नेमळेकर एवढी स्वस्त झालेली नाहीय..

अपूर्वाचा हा अवतार पाहुन प्रेक्षकांना चांगलाच धक्का बसला आहे.
Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar and vikas fun moment kidding each other
Bigg Boss Marathi 4 apurva nemlekar and vikas fun moment kidding each other sakal

bigg boss marathi 4: 'बिग बॉस मराठी'चा खेळ आता चांगलाच रंगू लागलेला आहे. स्पर्धकांनाही आता हा खेल नेमका काय आहे आणि तो कसा खेळायचा याचा अंदाज आल्याचे दिसत आहेल. त्यामुळे प्रत्येकजन आपापल्या पद्धतीने खेळी करून पुढे जात आहे. आता खेळी होणार म्हणजे वाद, भांडण आणि राडे आलेच. ते काही बिग बॉसच्या घराला काही नवीन नाही. पण नुकतेच बिग बॉसच्या घरात एक वेगळीच धमाल अनुभवायला मिळाली.

बिग बॉसच्या (bigg boss marathi) घरात पहिल्यांदाच अशी मस्ती, मस्करी आणि काहीसा मजेशीर राडा पाहायला मिळाला. एरव्ही सगळ्यांना धारेवर धरणाती, कठोरपणे वागणारी अपूर्वा नेमळेकर चक्क यावेळी वेगळ्याच भूमिकेत दिसली. काही दिवसांपूर्वी विकास आणि अपूर्वामध्ये चांगल्याच गप्पा रंगलेल्या दिसल्या. यावेळी ते दोघेही एकमेकांची मस्करी करत होते. अपूर्वा त्यावेळी म्हणाली होती.. 'विकास मित्रा मला खात्री आहे एक दिवस टास्कमध्ये तू मला पण उचलशील. या घरात कुठलाही पुरुष उचलू नाही शकला, तरी तू मला उचलशील... ज्याअर्थी तू माझी बॅग उचलीस त्याअर्थी...” विकास म्हणाला, “मला पण वाटतं आहे...” त्यावर अपूर्वाने विकासाला अपूर्वा भन्नाट उत्तर देते. ती म्हणते,"पण हि संधी मी तुला देणार नाही."

याचाच पुढचा परत आज पाहायला मिळाला. कालच्या भागात विकास चक्क अपूर्वाला उचलून घेत होता. तसा प्रयत्नही त्याने केला. अपूर्वा त्याला म्हणते.. चल.. उचल मला.. त्यावर विकास थेट तिला उचलू लागतो. त्यावर अपूर्वा म्हणते.. 'ए भाई विकास.. मला उचलण्याएवढी अपूर्वा नेमळेकर अजून स्वस्त झालेली नाहीय..' तर नंतर अपूर्वा थेट विकासच्या अंगावरच बसते आणि म्हणते.. आता हललास तर बघ.. त्यांच्यातील ही धमाल मस्ती पाहुन इतर सदस्य तर अक्षरशः थक्क झाले होते. किंबहुना अपूर्वाचा हा अंदाज प्रेक्षकांनाही भलताच भावला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com