esakal | आर्यनसोबत अटकेत असलेल्या अरबाज मर्चंटच्या वडिलांकडून एनसीबीचं कौतुक
sakal

बोलून बातमी शोधा

aryan khan Arbaaz Merchant

आर्यनसोबत अटकेत असलेल्या अरबाज मर्चंटच्या वडिलांकडून NCB चं कौतुक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

क्रूझवर पार्टी करण्यासाठी ड्रग्ज घेऊन गेल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा Shah Rukh Khan मुलगा आर्यन खानसह Aryan Khan आठही जणांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. ड्रग्जप्रकरणी आर्यन खानसह मुनमुन धामेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट Arbaaz Merchant यांना एनसीबीने अटक केली होती. अरबाज मर्चंटचे वडील अस्लम मर्चंट यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत एनसीबीचं कौतुक केलं आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "इतक्यात या प्रकरणावर मी काही बोलणं योग्य ठरणार नाही. पण एनसीबी अधिकाऱ्यांची मुलांसोबतची वागणूक चांगली होती. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे आणि सत्य लवकरात लवकर सर्वांसमोर येईल. त्यांची निर्दोष सुटका होईल."

हेही वाचा: Drugs case: आर्यनचे वकील सतीश मानेशिंदेंची एका दिवसाची फी ऐकून व्हाल थक्क!

अरबाज मर्चंट कोण आहे?

अरबाज मर्चंट हा अभिनेता आहे. शाहरुखचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहानाचा तो जवळचा मित्र आहे. आर्यन आणि सुहानासोबत अनेकदा पार्टी करताना अरबाज दिसला आहे. कॉर्डेलिया क्रूझवर आर्यनसोबत अरबाजला अटक झाल्याचे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिघांचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. अरबाज मर्चंट हा अभिनेत्री आलिया फर्निचरवाला हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा होत्या.

आर्यनसह अरबाज आणि मुनमुन यांना न्यायालयात उपस्थित केलं असताना हे तिन्ही आरोपी विदेशातील ड्रग्स संपर्कात असल्याचा युक्तीवाद एनसीबीच्या वकिलांनी केला होता. ''आर्यन खानसह तिन्ही आरोपी नेहमी एका ड्रग्ज तस्कऱ्याकडून ड्रग्ज घेत होते. आरोपीच्या मोबाईलमधून त्या संदर्भातील चॅट सापडले आहे. आरोपी हे विदेशातील नागरिकांच्या संपर्कात असून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे'', असं वकील म्हणाले होते.

loading image
go to top