...म्हणून NCBच्या बॉलीवूडकरांवर कारवाया; सुशांत सिंहच्या वकीलांचा दावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aryan khan
...म्हणून NCBच्या बॉलीवूडकरांवर कारवाया; सुशांत सिंहच्या वकीलांचा दावा

...म्हणून NCB कडून बॉलीवूडकरांवर कारवाईचा ससेमिरा

क्रूझ ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने केलेल्या कारवाईपासून आर्यन खान हे नाव चर्चेत आहे. आर्यन खानला ताब्यात घेतल्यापासून ते त्याला जामीन मिळेपर्यंत सर्वांचं लक्ष त्याच्यावर लागून होतं. यावेळी काही लोकांनी आर्यन खानचं समर्थन केलं तर काहींनी एनसीबीने केलेल्या कारवाईचं, मात्र आता सुशांत सिंह जपुत प्रकरणात सुशांतच्या कुटुंबाची बाजू मांडणारे वकील विकास सिंह यांनी एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत.

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोला माध्यमांमध्ये येण्याची खूप इच्छा असते, त्यामुळेच ही अशी प्रकरणं काढली जात आहेत, असं वक्तव्य विकास सिंह यांनी एनडीटीव्हीशी बोलताना केलं आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर एनसीबीने केलेल्या कारवाईनंतर विकास सिंह यांचं हे विधान आहे. विकास सिंह यांनी जून २०२० मध्ये अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या विरोधात सुशांत सिंहच्या वडिलांकडून ही केस लढवली होती. सुशांत सिंहगच्या मृत्यूनंतरच बॉलीवूडमधील ड्रग प्रकरणाची लिंक समोर आली होती.

हेही वाचा: 'माझ्या मुलीबद्दल बोलाल, तर गळा चिरीन', काम्या पंजाबीचा संताप

एनसीबीवर आरोप करताना ते पुढे म्हणाले की, बॉलीवूडवर निशाणा साधत बॉलीवूडला बदनाम करणं चुकीचं आहे. एनसीबीची अशी भूमिका योग्य नाही, ते मोठे मासे सोडून फक्त लोकांचं दिशाभूल करण्याचं काम करत आहेत.

Web Title: Ncbs Action Against Bollywood Actors Sushant Singh Lawyers Claim

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Bollywood NewsNCB
go to top