Jhund Movie : राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी केलं 'झुंड'चं आयोजन

Jitendra Awhad
Jitendra Awhadesakal
Summary

'कश्मिर फाइल्स'मध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला काही लोकं जातीय रंग देत आहेत.

सोशल मीडियावर गेले काही दिवस झुंड (Jhund) की पावनखिंड (Pavankhind) की कश्मीर फाईल्स? असा प्रश्न खूप ट्रेंड होताना दिसत आहे. यामुळं एकंदरच समाजातल्या जातीयवादावर पुन्हा उघडपणे भाष्य केलं जाऊ लागलंय. सिनेमाच्या आड सोशल मीडियावर उघडपणे भांडणं होत आहेत. 2 गट पडले आहेत, सिनेमातल्या विषयाला धरून या सगळ्या चर्चेला जातीय रंग देण्याचासुद्धा प्रयत्न सुरूय.

सर्वप्रथम झुंडमधल्या बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या (Babasaheb Ambedkar Jayanti) एका गाण्यानं आणि त्यातल्या एका फ्रेमनं या वादाला सुरुवात झाली, आता कश्मिर फाइल्समध्ये (The Kashmir Files) काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायाला काही लोकं जातीय रंग देत आहेत. शिवाय, हा सिनेमा अमुक पार्टीचा आणि तो सिनेमा तमुक पार्टीचा अशा बिनबुडाच्या पोस्ट टाकून या विषयाला राजकीय वळणसुद्धा दिलं जातंय.

दरम्यान, भाजपशासित हरियाणा, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये कश्मीर फाइल्स चित्रपट करमुक्त झाल्यानंतर राजस्थानमध्ये चित्रपट करमुक्त करण्याची मागणी केली जात आहे, त्यामुळं या चित्रपटांच्या माध्यमातून राजकारणी लोक जातीयद्रुवीकरण तर करत नाहीत ना? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होऊ लागलाय. सध्या भाजप (BJP) नेते कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या शो'चं आयोजन करत असताना आता राष्ट्रवादीचे (NCP) मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील 'झुंड' चित्रपटाचा विशेष शो आयोजित केला असल्याचं कळतंय. या शो'ला स्वत: दिग्दर्शक नागराज मंजुळे हे देखील उपस्थित राहणार असून याबाबतचे पोस्टर प्रसिध्द करण्यात आलं आहे. हा विशेष शो ठाण्यामध्ये 19 मार्चला होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com