The Kerala Story : 'द केरळ स्टोरी' चित्रपट बनवणाऱ्याला जाहीररित्या फाशी द्या; आव्हाडांच्या वक्तव्याने खळबळ

NCP leader Jitendra Awhad says The Kerala Story produced should be hanged in public
NCP leader Jitendra Awhad says The Kerala Story produced should be hanged in public

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाला भाजप शासित राज्यांमध्ये टॅक्स फ्री करण्यात येत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारने या चित्रपटावर बंदी घातली आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी द केरळ स्टोरी चित्रपट हा केरळला बदनाम करणारा असून याच्या निर्मात्याला फाशी देण्याची मागणी केली आहे.

दरम्यान या चित्रपटाबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत असताना जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक वक्तव्य केलं आहे. आव्हाड म्हणाले की, 'द केरळ स्टोरी'च्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. अधिकृत आकडा जो समोर आला आहे तो 3 असून त्याला 32,000 दाखवण्यात आलं. या काल्पनिक चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या व्यक्तीला सार्वजनिकरित्या फाशीची दिली पाहीजे, असे आव्हाड म्हणले आहेत.

NCP leader Jitendra Awhad says The Kerala Story produced should be hanged in public
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंची सत्ता राहाणार की जाणार? सत्तासंघर्षावर कायदेतज्ज्ञांनी वर्तवल्या 'या' शक्यता

सध्याच्या घडीला द केरळ स्टोरी चित्रपटावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. लव जिहाद सारख्या वेगळ्या मुद्याला स्पर्श करत हा चित्रपट हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांतील काही गोष्टींवर प्रकाशही टाकतो.

दरम्यान 5 मे रोजी प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरीवरुन वेगळ्या प्रकारची चर्चा सुरु झाली आहे. सोशल मीडियावर देखील या चित्रपटावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहे. प्रतिक्रिया देण्यात बॉलीवूडचे दिग्गज सेलिब्रेटी, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांची संख्या मोठी आहे.

काही लोक या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही करत आहेत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने सुनावणी करण्यास नकार दिला. यासोबतच उच्च न्यायालयानेही चित्रपटावर बंदी घालण्यास नकार दिला. मात्र उच्च न्यायालयाने चित्रपट निर्मात्यांना 32000 मुलांचे धर्मांतर झाल्याचा आकडा हटवण्याचे आदेश दिला होता.

NCP leader Jitendra Awhad says The Kerala Story produced should be hanged in public
Bus Accident News : पुलावरून बस कोसळली! १५ जण ठार तर २५ जखमी; बचावकार्य सुरू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com