'चितळेंची फक्त बाकरवाडी, केतकी तर..' राष्ट्रवादीच्या या नेत्याची गंभीर टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncp member suraj chavhan on ketaki chitale

'चितळेंची फक्त बाकरवाडी, केतकी तर..' राष्ट्रवादीच्या या नेत्याची गंभीर टीका

टीव्ही अभिनेत्री केतकी चितळे (ketaki chitale) नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं चर्चेत असते. आता तिनं पुन्हा एकदा असाच प्रकार केला असून यावेळी तिनं राज्यातील ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केली. (Ketaki Chitale made offensive post about Sharad Pawar) या प्रकरणी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आता केतकीवर टीकेची झोड उठली आहे.

हेही वाचा: शरद पवारांवरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी केतकी चितळेवर गुन्हा दाखल

केतकीने शरद पवार यांच्यावर मर्यादा ओलांडून टीका केली. केतकीने 'तुका म्हणे पवारा l नको उडवू तोंडाचा फवारा ll ऐंशी झाले आता उरक l वाट पहातो नरक.. अशी कविता पोस्ट केली होती. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही कविता तिने पोस्ट केली. यात अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे. केतकीचे ही पोस्ट व्हायरल झाल्याने तिला ती चांगलीच भोवली आहे. केतकीवर कळवा आणि पुण्यात गुन्हा दाखल आला असून आता विरोधकही तिच्यावर टीका करत आहेत.

हेही वाचा: केतकी चितळे पुन्हा बरळली; शरद पवारांविषयी केली आक्षेपार्ह पोस्ट

राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सुरज चव्हाण (ncp leader suraj chavhan) यांनीही दोन कवितेच्या ओली ट्विट करून केतकीवर निशाणा साधला आहे. 'नको करू एवढे पाप I शेवटी पवार साहेबचं तुझा बापII चितळेंची चाले फक्त भाकरवाडी I केतकी तर चार आण्याची पुडी I' अशी टीका त्यांनी केली आहे. सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट असून केतकीला अटक करण्याची मागणी होत आहे. (suraj chvhan comment on ketaki chitale)

Web Title: Ncp Leader Suraj Chavhan Comment On Actress Ketaki Chitale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top