'एनसीपीए'त रंगणार 'प्रतिबिंब' नाट्य महोत्सव.. दिग्गजांची हजेरी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncpa pratibimb natya mahotsav

'एनसीपीए'त रंगणार 'प्रतिबिंब' नाट्य महोत्सव.. दिग्गजांची हजेरी..

NCPA PRATIBIMBA : दि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) तर्फे ‘प्रतिबिंब' या नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ४ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 'प्रतिबिंब' २० मे २०२२ रोजी होणार आहे. ३ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात मराठीतील नामवंतांच्या कलाकृतींचे सादरीकरण केले जाईल.

हेही वाचा: PHOTO : सोनालीने नवऱ्यासोबत केलं लिप लॉक.. पाहा हनिमूनचे 'ते' फोटो..

या महोत्सवाची सुरुवात २० मे २०२२ रोजी ‘अध्यात मी सध्यात तू मध्यात म कुणी नाही’ या मराठी नाटकाने होणार आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २१ मे २०२२ रोजी या महोत्सवात प्रख्यात मराठी लेखक पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, (पु. ल. देशपांडे) यांच्या विनोदी आणि समीक्षात्मक कार्याचे सादरीकरण ‘अपरिचित पु लं’ या अभिवाचनातून होईल. त्याचदिवशी प्रियदर्शन जाधव दिग्दर्शित 'मुंबईचे कावळे' हे विनोदी आणि विचार करायला भाग पडणारे नाटक सादर केले जाईल. शफात खान यांनी ४० वर्षांपूर्वी लिहिलेले हे नाटक आजच्या परिस्थितीवरही अचूक भाष्य करते. या नाटकात अनिल बाबुराव शिंदे, हृषीकेश शेलार, संतोष सरवदे, विक्रांत कोळपे, सुशांत कुंभार आणि प्रशांत पलाटे या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.

हेही वाचा: 'कापडं जवळपास खेचून काढावी लागतात..' विशाखा सुभेदारची पोस्ट

या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ‘थिएटर कट्टा’ हे सादरीकरण प्रेक्षकांना पाहायला मिळेल, जिथे मराठी रंगभूमीचे तीन दिग्गज - सतीश आळेकर, चंद्रकांत काळे आणि विजय केंकरे - एकत्र येऊन त्यांच्या आवडी, प्रक्रिया, नाटके आणि रंगभूमीवरील एकूणच सर्व गोष्टींवर चर्चा करतील. ‘संगीत देवबाभळी’ या नाटकाने या महोत्सवाची सांगता होईल.

Web Title: Ncpa Organize Marathi Drama Pratibimba Festival

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top