रियाच्या कॉल डिटेल्सचा खुलासा, ५ दिवसांत सुशांतला केले होते २५ कॉल?

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 6 August 2020

सुशांतने नोव्हेंबरमध्ये बहिणीची मदत मागण्यासाठी फोन केला होता आणि चंदीगढला जाण्यासाठी त्याच्या तीन बहिणींसोबत तिकीट बुक केलं होतं.

मुंबई- सुशांत सिंह राजपूत प्रकरणात क्षणाक्षणाला नवीन खुलासे होत आहेत. याप्रकरणात सगळ्यांचं लक्ष रिया चक्रवर्तीकडे आहे. आता रियाच्या कॉल डिटेल्सचा देखील खुलासा झाला आहे. या कॉल डिटेल्सनुसार जेव्हा सुशांत २० ते २४ जानेवारी २०२० च्या दरम्यान त्याची बहीण राणी दी ला भेटण्यासाठी चंदीगढला गेला होता तेव्हा रियाने त्या ५ दिवसांत जवळपास त्याला २५ वेळा फोन केले होते. 

धक्कादायक: 'कहानी घर घर की' फेम अभिनेता समीर शर्माची आत्महत्या

एका प्रसिद्ध वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतने नोव्हेंबरमध्ये बहिणीची मदत मागण्यासाठी फोन केला होता आणि चंदीगढला जाण्यासाठी त्याच्या तीन बहिणींसोबत तिकीट बुक केलं होतं. मात्र रिया चक्रवर्तीने त्याला ब्लॅकमेल केलं आणि त्याला थांबण्यासाठी सांगितलं. 

त्यानंतर डिसेंबरमध्ये सुशांतने नवीन नंबरवरुन फोन करुन मदतीची मागणी केली होती. सुशांतने म्हटलं होतं की रिया आणि तिचे कुटुंबिय त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जायचं नाहीये. तो मुंबईमधील सगळं संपवून हिमाचलमध्ये कुठेतरी सेटल होईल.

त्यानंतर तो गाडीने निघून गेला. त्याने गाडी स्वतः चालवली कारण चुकीच्या गोळ्या घेतल्याने त्याला क्लौस्ट्रोफोबियातची तक्रार जाणवू लागली होती. सुशांत स्वतः गाडी चालवत चंदीगढला पोहोचला आणि तिथे २ दिवस राहिला. तेव्हा सिद्धार्थ पठानीने रियाला त्याच्या जाण्याविषयी सांगितलं. त्यानंतर रियाने त्याला पुन्हा घरी परत येण्यासाठी ब्लॅकमेल केलं आणि ३ ते ४ दिवसात त्याला जवळपास २५ वेळा फोन केल्याची माहिती समोर येत आहे.    

sushant singh rajput case rhea chakraborty phone call details she made 25 calls in 5 day  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushant singh rajput case rhea chakraborty phone call details she made 25 calls in 5 day