esakal | अभिनेत्री नीना गुप्ताला का चिडल्या? Video झाला व्हायरल
sakal

बोलून बातमी शोधा

neena

अभिनेत्री नीना गुप्ताला का चिडल्या? Video झाला व्हायरल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बॉलीवू़डच्या ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता (bollywood actress) त्यांच्या उत्तम अभिनयासोबतच त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी देखिल ओळखल्या जातात. नीना या सोशल मिडियावर चांगल्याच सक्रिय असतात. त्या सतत सोशल मिडियावर चाहत्यांसाठी काहीतरी पोस्ट करत असतात. सध्या नीनाने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओची चर्चा होत आहे. एअरपोर्ट स्टाफचा एकमेंकासोबत संवाद नसल्यामुळे तिला कसा त्रास सहन करावा लागला, हे या व्हिडिओ मध्ये तिने सांगितले आहे.

या व्हिडिओला 'सच कहू तो' अस कॅप्शन दिल असून , त्या म्हणतात, "आज मला एअरपोर्टवर फारच वाईट अनुभव आला . तुमच्याकडे ऑनलाइन बोर्डिंग पास जरी असेल तरीही त्याची हार्ड कॉपी स्वतः जवळ ठेवा . जी माझ्याकडे नव्हती आणि मी रांगेत उभी होते. त्यांनी मला बोर्डिंग पास मागितला. यावर, 'अरे मी विसरले', असं मी त्यांना म्हणाले. जेव्हा मी माझा बोर्डिंग पास आणायला गेले तेव्हा एका स्टाफ ने तुमच्या फोनमध्ये असलेला ऑनलाइन बोर्डिंग पास चालेल असं सांगितलं. मग मी पुन्हा रांगेत उभी राहिले. आणि त्यांनी पुन्हा मला बोर्डिंग पासची हार्ड कॉपी मागितली. यावर मला राग आला . खरं तर मला चिडायचे नव्हते , पण मी चिडले. तुम्ही गोष्टी आपआपसांत ठरवायला हव्यात, असं मी त्यांना म्हणाले."

नीना यांच्या या पोस्टवर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशाप्रकारे विमानतळावर उभं राहून व्हिडिओ शूट केल्यामुळे नीना यांना काही नेटेकऱ्यांनी ट्रोल केले आहे, तर काहींनी त्यांना पाठींबा देखिल आहे. नीना गुप्ता यांनी 'डायल १००' आणि 'सरदार का ग्रण्डसन' हे चित्रपट केले आहेत. तर आगामी चित्रपट 'गुडबाय' मध्ये नीना 'अमिताभ बच्चन' सोबत अभिनय करताना दिसू शकतात.

हेही वाचा: नीना गुप्ता यांच्या आत्मचरित्रातील ६ धक्कादायक खुलासे

हेही वाचा: छोटे कपडे घालून गुलजारांना भेटायला गेलेल्या नीना गुप्ता ट्रोल

loading image
go to top