अभिनेत्री नीतू कपूर यांनी ७ वर्षांनंतर सेटवर केलं कमबॅक, 'या' सिनेमाच्या शूटींगला केली सुरुवात

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 17 November 2020

करण जोहरच्या खर्मा प्रोडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनत आहे. या सिनेमातून अभिनेत्री नीतू कपूर ७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 

मुंबई- बॉलीवूड अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर स्टारर कॉमेडी सिनेमा 'जुग जुग जियो'चं सोमवारी चंदीगढमध्ये शुटींग सुरु झालं. या सिनेमाचं दिग्दर्शन राज मेहता करत आहेत. करण जोहरच्या खर्मा प्रोडक्शन अंतर्गत हा सिनेमा बनत आहे. या सिनेमातून अभिनेत्री नीतू कपूर ७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत. 

हे ही वाचा: कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली'वर हृतिक रोशनचा बुक्क्यांचा मार पाहिलात का? हसून व्हाल लोटपोट  

धर्मा प्रोडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडल वरुन ट्विट करत याबाबतची माहिती शेअर करण्यात आली आहे. या ट्विटमध्ये लिहिलंय, 'तुम्हा सगळ्यांच्या आशिर्वादाने आणि प्रेमामुळे जुग जुग जियो या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. या सिनेमातून ऋषी कपूर यांच्या पत्नी आणि अभिनेत्री नीतू कपूर ७ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.'

७ वर्षांपूर्वी नीतू कपूर 'बेशरम' या सिनेमात त्यांचा मुलगा आणि अभिनेता रणबीर कपूर आणि दिवंगत पती, अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत झळकल्या होत्या. नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर मेकरुममधील त्यांचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिलंय, ''अनेक वर्षांनंतर सेटवर एक नवीन सुरुवात आणि सिनेमाच्या जादूसाठी मी पुन्हा आली आहे. कपूर साहेबांपासून ते रणबीरपर्यंत सगळे नेहमीच माझ्यासोबत राहिले आहेत. तुम्हा सगळ्यांचं प्रेम मला जाणवतंय. आता मी स्वतःला सांभाळू शकते. थोडी भिती वाटतेय पाण मला माहित आहे की तुम्ही माझ्यासोबत आहात.'' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

अभिनेते अनिल कपूर यांनी देखील नीतू यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट करत तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी लिहिलंय, 'सेटवर तुमचं कमबॅक पाहुन खूप आनंद झाला. आम्ही सगळेच तुमच्यासोबत आहोत. आम्हाला माहित आहे की तुम्ही पुन्हा एकदा पडद्यावर धमाल कराल. मी तुमच्यासोबत 'जुग जुग जियो'चा भाग असल्याचा मला आनंद आहे.' या सिनेमातून प्रसिद्ध युट्युबर प्राजक्ता कोळी देखील बॉलीवूडमध्ये डेब्यु करत आहे.   

neetu kapoor returns on set from the film jug jug jiyo shooting start  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: neetu kapoor returns on set from the film jug jug jiyo shooting start