
मुंबई : ओ साकी साकी, याद पिया की आने लगी, आंख मारे यांसारखी सुपरहिट गाणी बॉलिवूडला देत बॉलिवूडची सिंगिंग सेन्सेशन गायिका नेहा कक्करने प्रत्येक संगीत प्रेमींची मनं जिंकली. तिच्या आवाजाची जादू फक्त भारतातच नाही तर जगभरात पसरली आहे. जगभरातील संगीत प्रेमी तिच्या आवाजाच्या प्रेमात आहेत. त्यामुळेच नेहा आता इंटरनॅशनल स्टार बनली आहे. नेहाने जगभरातील गायिकांना मागे टाकत यूट्यूबवर सर्वात जास्त सर्च केलेल्या टॉप १० मध्ये दुसऱ्या स्थानावर येऊन देशाचं नाव मोठं केलं आहे.
एक्स अक्ट्स चार्ट च्या माहितीनुसार सर्व इंटरनॅशनल फिमेल सिंगर्सला मागे टाकत नेहाने दुसरे स्थान पटकावले आहे. ही यादी २०१९ साली यूट्यूबवर सर्वात जास्त सर्च केलेल्या महिला गायिकेंची आहे. यामध्ये अमेरिकन गायिका कर्डी बी ही ४.८ बिलियन व्ह्यू मिळवून पहिल्या क्रमांकावर आहे तर ४.५ बिलियन व्ह्यू मिळवून नेहा दुसऱ्या स्थानावर आहे. याची माहिती स्वतः नेहाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत दिली आहे. आणि तिच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
या यादीमध्ये जगभरातील प्रसिद्ध गायिकांची नावे आहेत. यामध्ये कोलंबियन गायिका केरोल जी, साऊथ कोरियन गर्ल ग्रुप ब्लॅकपिंक, अमेरिकन गायिका एरियाना ग्रांडे, सेलिना गोम्स आणि बिली एलिस, अमेरिकन रॅपर निकी मिनाज, अमेरिकन गायिका बेकी जे यांसारख्या इंटरनॅशनल गायिकांची नावे या यादीत आहेत. या यादीमध्ये नेहा शिवाय कोणत्याही भारतीय गायिकेचे नाव नाही. या यादीत दुसरं स्थानावर येऊन नेहा खूप आनंदी आहे. नेहाच्या करिअरची सुरवात 'इंडियन आयडॉल ६' या सिंगिंग रिऍलिटी शोपासून झाली होती. त्यावेळी नेहा हा शो जिंकू शकली नाही पण आता मात्र इंडियन आयडॉल याच शोची ती परीक्षक आहे. आणि आता आपल्या आवाजाने अनेकांच्या मनावर राज्य करत आहे.
neha kakkar on becoming the second most watched female star on youtube
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.