
मुंबई ः बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या मराठमोळ्या कलाकारांची यादी तशी भली मोठी आहे. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, विजय पाटकर, अमृता खानविलकर, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, अमृता सुभाष, तेजश्री प्रधान अशी बरीच आघाडीची नावे आहेत. बॉलिवूडमध्येही मराठी कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे. इतकंच काय तर बॉलिवूडमधील दिग्गजही मराठी कलाकारांचं भरभरुन कौतुक करताना वारंवार दिसतात. आता आणखी एक मराठी अभिनेता बॉलिवूडच्या बिग बजेट चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे. आणि तो अभिनेता म्हणजे 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेता प्रवीण तरडे.
मराठी चित्रपटसृष्टीमधील हा पावरफुल अभिनेता आता बॉलिवूडच्या रिंगणात उतरला आहे. दिग्दर्शक, लेखक, अभिनेता या साऱ्या बाजू प्रवीण चोखपणे सांभाळतो. आता बॉलिवूडचा सुप्रसिद्ध खान म्हणजेच सलमान खान त्याच्या अभिनयाच्या प्रेमात पडला आहे. सलमानने त्याच्या आगामी 'राधे' चित्रपटासाठी त्याला विचारणा केली आणि प्रवीणनेही त्यासाठी लगेचच होकार कळवला.
प्रवीणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत खुलासा केला आहे. प्रवीण म्हणतो, 'मुळशी पॅटर्न' चित्रपटाच्या हिंदी रिमेक चित्रपटामुळे सलमान आणि माझी भेट झाली. तो या चित्रपटाचा हिंदी रिमेक करत आहे. त्याने माझा अभिनय पाहिला आणि 'राधे'मधील एका भूमिकेसाठी मला विचारणा केली. मी देखील वेळ न दवडता लगेचच होकार दिला. सलमानबरोबर काम करण्याची संधी मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.'
बिग स्टार आणि बड्या चित्रपटात काम करायला मिळल्याने प्रवीणचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. 'राधे'मधील त्याच्या भूमिकेबाबत प्रवीण सांगतो, 'मी या चित्रपटात एका मराठी माणसाची भूमिका साकारली आहे. जवळपास 10 ते 12 दिवस मी सलमानबरोबर चित्रीकरण केलं.'सेटवर सलमानचं वावारणं पाहूनही प्रवीण अगदी भारावून गेला होता.
सलमानला चांगलं मराठी बोलता येतं. पक्का महाराष्ट्रीन तो शोभून दिसतो. असेही प्रवीण बोलत होता. प्रवीणने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख आणि स्थान निर्माण केले आहे. 'मुळशी पॅटर्न' हा त्याचा चित्रपट तर मराठी चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित चित्रपट ठरला. या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला होता आणि त्याला अनेक पुरस्कारही मिळाले होते.
pravin tarde joins salman khan in radhe
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.