esakal | गायिका नेहा कक्कर लग्नानंतर पहिल्यांदाच पती रोहनप्रीतसोबत झळकणार पडद्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

neha rohanpreet

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहेत. ज्याची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर आली आहे.

गायिका नेहा कक्कर लग्नानंतर पहिल्यांदाच पती रोहनप्रीतसोबत झळकणार पडद्यावर

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर गेल्या काही दिवसांपासून तिच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. तिने नुकतंच गायक रोहनप्रीतसोबत लग्न केलं आहे. या दोघांच्या लग्नाचे आणि शाही सोहळ्याचे अनेक फोटो लगेचच सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. तसंच लग्नानंतर हनीमुनच्या ठिकाणचे फोटो देखील सोशल मिडियावर चांगलेच चर्चेत होते. आता नेहा कक्कर लग्नानंतर पहिल्यांदा पती रोहनप्रीतसोबत पडद्यावर झळकणार आहे. 

हे ही वाचा: सैफ अली खानला वाटतंय मुलगा इब्राहीमने बॉलीवूडमध्ये 'या' अभिनेत्यासारखी करावी धमाकेदार एंट्री  

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत कॉमेडियन कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा शो'मध्ये दिसणार आहेत. ज्याची पहिली झलक नुकतीच प्रेक्षकांसमोर आली आहे. सोनी टीव्हीने नुकताच त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरुन नेहा आणि रोहनप्रीत यांच्या आगामी एपिसोडची एक झलक शेअर केली आहे. या प्रोमोमध्ये असं सांगितलं आहे की लग्नानंतर पहिल्यांदा हे कपल एकत्र अशा अंदाजात दिसणार आहे.

इतकंच नाही तर या व्हिडिओमध्ये हे देखील पाहायला मिळतंय की कपिल शर्मा कशाप्रकारे या कपलचा क्लास घेत आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये एकीकडे रोहनप्रीत आणि नेहा कक्कर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून प्रेमाच्या भावना व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे कपिल शर्मा देखील मस्तीमूडमध्ये पाहायला मिळतोय. यासोबतंच या नवविवाहीत जोडप्याला या शोमध्ये बोलवून सेटवर लग्नाच्या विधी देखील करुन घेतल्या गेल्या आहेत.    

neha kakkar first time on screen with husband rohanpreet singh in the kapil sharma show  

loading image
go to top