
तारक मेहता का उल्टा चष्मा: अभिनेत्रीनं केली निर्मात्यांची पोलखोल; म्हणाली..
'तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मालिकेतील जुनी अंजली मेहता(Anjali Mehta) आपल्या सगळ्यांच्याच लक्षात असेल. अभिनेत्री नेहा मेहतानं(Neha Mehta) तारक मेहताच्या पत्नीचा रोल साकारला होता. १२ वर्षांपासून नेहा मेहता या मालिकेशी जोडली गेली होती. काही महिने आधीच तिनं या मालिकेला रामराम ठोकला होता. आता तिच्या जागी मालिकेत सुनैना फौजदार अंजलीची भूमिका साकारताना दिसत होती. आता मालिका सोडल्याच्या अनेक महिन्यानंतर अभिनेत्री नेहा मेहतानं सांगितलं आहे की मालिकेच्या निर्मात्यांनी तिचे पैसे थकवले आहेत. अभिनेत्रीचं म्हणणं आहे की तिला सहा महीन्यांचं मानधन अद्याप देण्यात आलेलं नाही, आणि प्रॉडक्शन हाऊसकडून ते कधी मिळणार याबाबतही ठोस उत्तर दिले गेलेलं नसून,उडवाउडवीची उत्तरं मिळत आहेत.(Neha Mehta reveals she is yet to get her 6 months dues for Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
हेही वाचा: 'तन ,मन,धन शिवसेना; बाकी विचारधारा गेल्या खड्ड्यात'; किरण माने पोस्ट चर्चेत
नेहा मेहतानं एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की,''मी जवळ-जवळ १२ वर्ष 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत काम केलं आहे. आणि २०२० मध्ये मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. पण मला गेल्या सहा महिन्यांचं मानधन मिळालेलं नाही. मी मालिका सोडल्यानंतर निर्मात्यांना फोन करुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि यासंदर्भात बोलले देखील होते. मी कुठलीही तक्रार करत नाही पण मला आशा आहे की माझे थकलेले पैसे मला परत मिळतील. मला माझ्या कष्टाचे पैसे मिळावेत एवढीच माझी अपेक्षा आहे''.
हेही वाचा: 'राम तेरी गंगा मैली' ची मंदाकिनी परत येतेय; धमाकेदार एन्ट्रीनं वेधणार लक्ष
तुमच्या माहितीसाठी इथं थोडक्यात सांगतो की अंजली आणि तारक यांची जोडी चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. शैलेश लोढा आणि नेहा मेहता दोघं एकत्रितपणे कविसंमेलन स्पेशल कार्यक्रम 'वाह,क्या बात है' च्या सूत्रसंचालनाची जबाबदारी देखील सांभाळत होते. त्या दोघांची जोडी ऑनस्क्रीनही हिट राहिली होती.
हेही वाचा: 'कवडीमोल' भावात अमिताभ यांना विकाव्या लागल्या 'अलिशान गाड्या', कारण?
मध्ये बातम्या होत्या की शैलेश लोढानं 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका सोडली. मात्र त्यात काही तथ्य नसल्याचं अभिनेत्यानं स्पष्ट केलं आहे. अभिनेत्री दिशा वकानी देखी दयाबेनच्या भूमिकेत परत दिसणार नाही. आता तिच्या जागी नव्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. आता प्रेक्षक या नवीन दयाबेनची मालिकेत परतण्याची वाट पहात आहेत. निर्मात्यांनी देखील दयाबेन लवकरच परत येणार आहे असं स्पष्ट केलं आहे.
Web Title: Neha Mehta Reveals She Is Yet To Get Her 6 Months Dues For Taarak Mehta Ka Ooltah
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..