‘नेट प्रॅक्‍टिस’ लघुपटाची आंतरराष्ट्रीय महोत्सवात बाजी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 डिसेंबर 2019

‘लाईट दिस लोकेशन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फायकस प्रोडक्‍शन्स प्रस्तुत ‘नेट प्रॅक्‍टिस’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लघुपटाने आशियातून दुसरा क्रमांक पटकावला. जागतिक पातळीवर पहिल्या १० लघुपटांमध्ये नेट प्रॅक्‍टिसची निवड झाली. 

मुंबई : ‘लाईट दिस लोकेशन’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये फायकस प्रोडक्‍शन्स प्रस्तुत ‘नेट प्रॅक्‍टिस’ या लघुपटाने बाजी मारली आहे. या लघुपटाने आशियातून दुसरा क्रमांक पटकावला. जागतिक पातळीवर पहिल्या १० लघुपटांमध्ये नेट प्रॅक्‍टिसची निवड झाली. 

‘लाईट दिस लोकेशन’ हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अमेरिकेमध्ये पार पडतो आणि त्यासाठी जगभरातून १२ ते १३ लघुपटांची निवड होते. त्यामध्ये आशियाई देशातून भारताचा ‘नेट प्रॅक्‍टिस’ हा लघुपट दुसरा ठरला आहे. या यशाबाबत लेखक व दिग्दर्शक सचिन कदम म्हणाले, ‘नेट प्रॅक्‍टिस’ लघुपटाने दुसरा क्रमांक पटकावल्यामुळे मी खूश आहे. याचे संपूर्ण श्रेय टीमला जाते. या लघुपटाचे लेखन व दिग्दर्शन सचिन कदम यांनी, तर निर्मिती संजीवनी कदम यांनी केले. सहायक दिग्दर्शनाची जबाबदारी निकिता अहिरे यांनी पार पाडली. चित्रीकरण चिन्मय जाधव यांचे असून संगीत प्रशांत-निशांत यांनी दिले. कलादिग्दर्शन चरित्र खरे, रंगभूषा अल्पा मिस्त्री, व्हीएफएक्‍स अक्षय गोळे, ध्वनिसंयोजन रोहित घोक्षे व टायटल डिझाईन अक्षय पवार यांनी केले आहे. या लघुटपटात तुषार शिंगाडे, अक्षया शेट्टी व प्रीती ननावरे या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारली आहे. 

‘नेट प्रॅक्‍टिस’ या लघुपटाची कथा एका तरुणाभोवती आधारित आहे. जो काही दिवसांनंतर लग्नबेडीत अडकणार आहे. लग्नाआधी तो कोणत्याही रिलेशनशिपमध्ये नव्हता. त्यामुळे त्याचे मित्र त्याला लग्नाच्या आधी पत्नीसोबत संबंध ठेवण्याआधी एकदा त्याबाबत अनुभव घेऊन बघ, असे सांगतात आणि तो तयारही होतो. त्यानंतर त्याला कोणकोणत्या अनुभवाला समोरे जावे लागते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Net practice' miniature wins international festival