disha vakani
disha vakani

'तारक मेहता..'ची 'दयाबेन' आहे इतक्या संपत्तीची मालकीण

मालिकेच्या एका एपिसोडसाठी मिळायचे इतके रुपये मानधन
Published on

'तारक मेहता का उल्टा चष्मा' Taarak Mehta Ka Ooltah Chashmah या मालिकेत दयाबेनची Dayaben भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी Disha Vakani ही चाहत्यांच्या नेहमीच लक्षात असेल. गेल्या काही वर्षांपासून ती या मालिकेपासून दूर राहिली तरी तिचा चाहतावर्ग कमी झालेला नाही. लग्नानंतर दिशा या लोकप्रिय मालिकेत काम करत होती. मात्र बाळंतपणासाठी तिने सुट्टी घेतली आणि पुन्हा मालिकेत परतलीच नाही. दिशाच्या परतण्यावरून अनेक चर्चा कलाविश्वात झाल्या, मात्र अद्याप तिने याबद्दल कोणतंही वक्तव्य केलं नाही.

'बॉलिवूड लाइफ' या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, 'तारक मेहता..'च्या एका एपिसोडसाठी तिला एक ते दीड लाख रुपये मानधन मिळत होतं. २०१७ मध्ये तिने दर महिन्याला जवळपास २० लाख रुपये कमावले. या मालिकेशिवाय दिशाने इतरही काही मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'देवदास', 'मंगल पांडे', 'जोधा अकबर', 'सी कंपनी', 'लव्हस्टोरी २०५०' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारल्या आहेत. तर 'खिचडी', 'हिरो भक्ती ही शक्ती है', 'आहट' यांसारख्या मालिकांमध्ये ती झळकली.

disha vakani
'शाब्बास शेरा' म्हणत क्रांतीने केलं समीर वानखेडेंचं कौतुक

'तारक मेहता..'मधील दयाबेनच्या भूमिकेमुळे तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली. याच प्रसिद्धीमुळे तिला अनेक जाहिरातींच्या ऑफर्स मिळाल्या. दिशाची एकूण संपत्ती ही जवळपास ३७ कोटी रुपये इतकं असल्याचं कळतंय. २०१५ मध्ये तिने मयूर पाडियाशी लग्न केलं. नोव्हेंबर २०१७ मध्ये दिशाने मुलीला जन्म दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com