भारतीयांसाठी खुशखबर! आता नेटफ्लिक्स होणार स्वस्त

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 जुलै 2019

नेटफ्लिक्सचे सध्याचे दर (दरमहा)-
- बेसिक प्लॅन : 500 रुपये
- स्टॅण्डर्ड एचडी प्लॅन : 650 रुपये
- प्रिमियम अल्ट्रा एचडी प्लॅन : 800 रुपये

नवी दिल्ली : आजकालच्या जगात मनोरंजनाची साधनं बदलली आहेत. आता सर्वजण फक्त नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार यांसारख्या अॅप्सच्या माध्यमातून अनेक वेगळ्या विषयांवरील चित्रपट आणि वेब सिरीजचा आनंद लुटतात. हाच आनंद आता द्विगुणित होणार आहे कारण नेटफ्लिक्स आता स्वस्त होणार आहे. 

नेटफ्लिक्सने आता दरमहा पॅकेजचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष बाब म्हणजे ही सेवा फक्त भारतीय युझर्ससाठी असणार आहे.

भारतामध्ये नेटफ्लिक्सला मागणी भरपीर आहे मात्र यासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने लोकं सबस्क्रिप्शन घेत नाहीत. त्यामुळेच भारतातील नेटफ्लिक्स युझर्सची संख्या वाढविण्यासाठी नेटफिक्सने दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हे नवीन दर कधी लागू होणार याबद्दल अद्याप कोणताही माहिती कंपनीने दिलेली नाही.  सध्या नेटफ्लिक्सवर कमीत कमी 500 रुपये दरमहापासून प्लॅन उपलब्ध आहे.

''मागील अनेक महिने आम्ही भारतीय युझर्सचा अभ्यास करत आहोत आणि म्हणूनच आता आम्ही मोबाइलवरुन नेटफ्लिक्स पाहणाऱ्या भारतीय युझर्ससाठी  नवीन प्लॅन्स बाजारात आणणार आहोत,'' अशी माहिती नेटफ्लिक्सचे कार्यकारी अधिकारी रेड हॅस्टींग्स यांनी दिली.  

भारतीयांसाठी येणाऱ्या नवीन प्लॅन्सची किंमत 5 डॉलरपर्यंत म्हणजेच अंदाजे 300 रुपये प्रतिमहिना इतकी असण्याची शक्यता  आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Netflix to reduce their subscription rates for Indian users