बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे होतंय विशालचं कौतुक | Vishal Nikam | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 3

बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यामुळे नाही तर 'या' कारणामुळे होतंय विशालचं कौतुक

सांगलीचा विशाल निकम (Vishal Nikam) हा 'बिग बॉस मराठी' (Bigg Boss Marathi 3) या लोकप्रिय शोच्या तिसऱ्या सिझनचा विजेता ठरला. गेल्या १०० दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमावर रविवारी अखेरचा पडदा पडला. या पर्वाचा उपविजेता जय दुधाणे ठरला. विशालला बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाख रुपयांचा धनादेश मिळाला. विशालला ट्रॉफी मिळाल्यानंतर बिग बॉसच्या घरातील त्याच्या मित्रमैत्रिणींनी मंचावर येऊन त्याला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर या कार्यक्रमाचे काही फोटो व्हायरल होत असून त्यातील एका गोष्टीने नेटकऱ्यांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोमुळे विशालचं विशेष कौतुक होत आहे.

सर्व मित्रमैत्रिणी मंचावर आल्यावर विशाल त्यांची गळाभेट घेतो. त्याचवेळी तो विकास पाटील आणि मीनल शाह या दोघांच्या हातात बिग बॉसची ट्रॉफी देतो. विशालने प्रेम आणि आदराची खूण म्हणून ट्रॉफी दोघांच्या हाती देतो. त्यानंतर तो विकासला खांद्यावर उचलून घेतो. हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून विशालच्या प्रेमळ स्वभावाचं नेटकरी कौतुक करत आहेत.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 3 Winner: सांगलीच्या विशाल निकमबद्दल काही खास गोष्टी..

कलर्स मराठी वाहिनीवर बिग बॉसचा यंदाचा तिसरा सिझन जोरदार गाजला होता. घरातील जोरदार भांडणं, नवनवीन टास्कने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलं. या कार्यक्रमात १०० दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील १५ कलाकारांनी सहभाग घेतला होता. त्यात आदिश वैद्य आणि निथा शेट्टी हे वाईल्ड कार्ड एण्ट्रीद्वारे सहभागी झाले होते. टॉप ५ स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांच्यामध्ये मोठी चुरस होती. यामध्ये विशाल निकमने बाजी मारली. अतिशय थाटामाटात हा महाअंतिम सोहळा पार पडला. सर्वचजण विशाल निकमवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

Web Title: Netizens Are All Praises For Bigg Boss Marathi 3 Winner Vishhal Nikam For This Reason

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top