Adipurush Controversy: 'सैफची दाढी काढताय,तर मग प्रभासची...', नेटकऱ्यांचा VFX बदलणाऱ्या मेकर्सला सल्ला

ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमातील VFX लोकांना खटकल्यानं सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.
Netizens Guide to Adipurush Makers, How to change VFX?
Netizens Guide to Adipurush Makers, How to change VFX?Google

Adipurush Controversy: 'आदिपुरुष' विषयी लोकांच्या असलेल्या अपेक्षांचा मोठा भंग तेव्हा झाला होता,जेव्हा सिनेमाच्या ट्रेलरमध्ये,रामाच्या भूमिकेत दिसला होता साऊथ स्टार प्रभास तर रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान. लोकांना सिनेमातील व्हीएफएक्स खटकलं होतं. जवळ-जवळ ५०० करोडच्या बजेटमध्ये बनलेल्या सिनेमात ज्या पद्धतीनं व्हीएफएक्स दिसलं होतं त्याला लोकांनीअक्षरशः कार्टुन म्हणत हिणवलं होतं.(Netizens Guide to Adipurush Makers, How to change VFX?)

Netizens Guide to Adipurush Makers, How to change VFX?
Karan Johar Troll: करणला 'सीमा आंटी' का म्हणू लागलेयत लोक?, स्वतः खुलासा करत म्हणाला...

या सिनेमामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचं देखील म्हटलं गेलं होतं. कारण लोकांना वाटलं की या माध्यमातून मेकर्सनी हिंदू देव-देवतांच्या कथेचा खेळखंडोबा केला आहे. याच कारणानं आता बोललं जात आहे की या सिनेमातील व्यक्तिरेखांच्या व्हीएफएक्सवर आता पुन्हा काम केलं जात आहे,ज्यामुळे जवळपास १०० करोडनं बजेट वाढणार आहे. आणि त्यामुळे सिनेमाची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.

Netizens Guide to Adipurush Makers, How to change VFX?
Sara Ali khan Photo: शुभमनच्या गावापर्यंत पोहोचली सारा अली खान?,समोर आलेल्या फोटोनं चर्चेला उधाण

आदिपुरुष सिनेमात व्हीएफएक्सवर पुन्हा काम करण्याच्या बातम्या दरम्यान आता एका व्हीएफएक्स आर्टिस्टची व्हिडीओ क्लीप चर्चेत आली आहे. ज्यानं सैफ अली खानच्या ड्रॅगन सीनला पुन्हा रीक्रिएट करत दाखवलं आहे. मजेची गोष्ट ही आहे की हे काम त्यानं घरबसल्या एका रात्रीत केलं आहे आणि कमालीचं उत्तम केलं आहे. याविषयी आता सोशल मीडियावर त्याची प्रशंसा केली जात आहे. सोशल मीडियावर नेटकरी त्याच्या कामाला दाद देत आदिपुरुषपेक्षा कितीतरी उत्तम म्हणू लागलेयत. लोक म्हणतायत,'आदिपुरुष एका बाजूला आणि तुझी कला एका बाजूला मित्रा'.

काही लोकांनी म्हटलं आहे की मेकर्सला देखील या अशा एखाद्या व्हीएफक्स आर्टिस्टची गरज आहे. काही लोकांनी 'सी हल्क' सोबत या व्हिएफएक्स आर्टिस्टची तुलना केली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की,'हे तर आदिपुरुषच्या ट्रेलरपेक्षा सर्वात उत्तम आहे'.

एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर प्रभासच्या राम अवतारातीला फोटोला शेअर करत म्हटलं आहे-'ऐकलंय की आदिपुरुष सिनेमाची टीम सैफ अली खानच्या रावण लूकमधनं दाढीला काढून टाकणार आहे, मला वाटतं की प्रभासच्या देखील मिशा काढून टाकाव्यात'.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com