esakal | ऋषी कपूर यांनी राज्य सरकारला केलेल्या मागणीवरून सोशल मिडियावर झाले ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषी कपूर यांनी राज्य सरकारला केलेल्या मागणीवरून सोशल मिडियावर झाले ट्रोल

संपूर्ण देश बंद असताना अभिनेते ऋषी कपूर यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित करत त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. त्यांनी राज्य सरकारकडे मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

ऋषी कपूर यांनी राज्य सरकारला केलेल्या मागणीवरून सोशल मिडियावर झाले ट्रोल

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - जगभरात कोरोना विशाषूचा वाढता प्रदुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाउन जाहिर केले. या काळात फक्त अत्यावश्यक सेवा असणारे कर्मचारी कार्यरत आहेत. संपूर्ण देश बंद असताना अभिनेते ऋषी कपूर यांनी केलेल्या ट्विटमुळे सर्वांनाच आश्चर्यचकित करत त्यांना ट्रोल करण्यात आले आहे. त्यांनी राज्य सरकारकडे मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

हे ही वाचा- लॉकडाऊनमध्ये अशी कमी करा दारुची तलफ

'राज्य सरकारने परवानाधारक असलेल्या मद्याची दुकाने सुरू करण्यात यावी. माझ्या असं बोलण्यामुळे मला चुकीचे समजू नका. लॉकडाऊनमुळे सगळेच घरी आहेत आणि सध्याचे वातावारण प्रत्येकामध्ये डिप्रेशन निर्माण होण्यासारखे आहे. त्यामुळे जसे लोक आधी मद्यपान करत होते तसे आताही करत आहेतच. त्यापेक्षा कादेशीररित्या त्याची विक्री करा. हे माझे विचार आहे.' असे ट्विट त्यांनी केले आहे. आणि त्यांच्या या ट्विटमुळे नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल केले आहे. त्यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स करून त्यांची खिल्ली उडवली आहे. 

'आरके जी सॅनिटायजरमधलं अल्कोहोल संपलं का?', ' लॉकडाईनला कोणीही गंभीरपणे पाहत नाही आहे.'  अशा अनेक कमेंट्करून नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाना साधला आहे.

loading image