'फुकटमध्ये पण तुझा सिनेमा पाहणार नाही', आलिया भट्ट झाली ट्रोल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Wednesday, 12 August 2020

'सडक २' सिनेमाचा ट्रेलर पाहून ट्विटरवर लोक आपापली प्रतिक्रिया देत आहेत. या ट्रेलरसोबतंच अभिनेत्री आलिया भट्टला देखील सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. एकुणच या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 

मुंबई- आलिया भट्ट, संजय दत्त आणि आदित्य रॉय कपूर स्टारर 'सडक २' सिनेमाचा ट्रेलर अखेर रिलीज झाला आहे. 'सडक २' या सिनेमाचा ट्रेलर आधी मंगळवारी रिलीज केला जाणार होता मात्र संजय दत्तच्या प्रकृतीविषयीची वाईट बातमी समोर आल्याने हा ट्रेलर एक दिवस पुढे ढकलला गेला. आणि आज बुधवारी हा ट्रेलर रिलीज झाल्यावरंच सोशल मिडियावर ट्रेंड व्हायला सुरुवात झाली. 

हे ही वाचा:  सैफ-करिनाकडे पुन्हा 'गुड न्युज', अधिकृतरित्या केलं जाहीर  

'सडक २' सिनेमाचा ट्रेलर पाहून ट्विटरवर लोक आपापली प्रतिक्रिया देत आहेत. काही जण ट्रेलर उत्तम असल्याची प्रतिक्रिया देत आहेत तर काहींनी अत्यंत वाह्यात ट्रेलरअसल्याचं म्हटलंय. या ट्रेलरसोबतंच अभिनेत्री आलिया भट्टला देखील सोशल मिडियावर ट्रोल केलं जात आहे. एकुणच या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमीश्र प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. 

एका यूजरने म्हटलंय, 'सडक २ सिनेमाच्या ट्रेलरला एका तासात दीड हजारपेक्षा जास्त लोकांची नापसंती. यावरुन काय ते समजून जावं. हा ट्रेलर युट्युबवर आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त नापसंती असलेला ट्रेलर असेल. नेपोटिझमचं पूर्ण दुकान' तर आणखी एका युजरने आलियाला ट्रोल करत म्हटलंय, 'स्वतः कमेंट सेक्शन बंद केलं आहेस. तु आमचं मत देखील जाणून घेणार नाहीस आणि आम्ही तुझा सिनेमा पाहायचा? असं कसं चालेल दीदी'. 

तर आलियाला ट्रोल करत पुन्हा एकाने म्हटलंय, 'आलिया, आदीत्य, संजू सगळ्यांचा महा वाह्यात अभिनय. हा सिनेमा फुकट दरी दाखवला तरी पाहणार नाही.'या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होण्या आधीपासूनंच सोशल मिडियावर नेपोटिझमच्या नावाखाली हा सिनेमा बायकॉट करण्याची मागणी होत होती. आता तर लोकांनी युट्युबवर या ट्रेलरचा पसंती पेक्षा नापसंतीच जास्त दर्शवल्याने प्रेक्षक किती नाराज आहेत आणि त्यांच मत किती महत्वाचं आहे हे दाखवून दिलं आहे.   

netizens troll alia bhatt film sadak 2 trailer says its disgusting  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: netizens troll alia bhatt film sadak 2 trailer says its disgusting