सोनू सूदचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'हे तर शेण..' | Sonu Sood | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonu sood

सोनू सूदचा फोटो पाहून नेटकरी म्हणाले, 'हे तर शेण..'

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद हा सतत गरजूंची मदत करताना दिसतो. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारा सोनू सूद हा सध्या अनेकांसाठी सुपरहिरो बनला आहे. तसेच सोनू सुद सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. सध्या त्याच्या एका ट्वीटची चर्चा होत आहे. या ट्वीटमुळे तो चांगलाच ट्रोल होत आहे.

सोनूने ट्विटर अकाऊंटवर दोन फोटो पोस्ट केले आहेत.सध्या तो पंजाबमध्ये आहे. त्या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा टीशर्ट परिधान केला आहे आणि पांढऱ्या रंगाचे बूट घातले आहेत. सोनूने तो फोटो पोस्ट करत ‘मेरे पंजाब दी मिट्टी दी खुशबू’ असं कॅप्शन दिलं होतं. पण या फोटोला दिलेल्या कॅप्शनमुळे सोनूला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. एका यूजरने सोनू सूदची खिल्ली उडवत ही माती नाही सर शेण आहे असं म्हटलं आहे. दुसऱ्या यूजरने, ‘सर, तुम्ही ज्याला माती समजत आहात खरं तर ते शेण आहे’ असं म्हटलं. सोनू सूदच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्याची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा: श्रेया बुगडेची 'बिग बॉस मराठी'मध्ये एन्ट्री?; फोटो पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

लवकरच सोनू सूद ‘पृथ्वीराज चौहान’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि संजय दत्त हे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोनू सुद त्याच्या सामाजिक कामामुळे नेहमीच चर्चेत असतो.

loading image
go to top