
भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटीत भारतानं बाजी मारली. अटीतटीच्या सामन्यात भारतानं विजय मिळवून कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्यास भाग पाडले.
मुंबई - ये हात जब आदमी पे पडता है ना तब वो आदमी उठता नही उठ जाता है हा संवाद कुणाचा हे कुणालाही लगेचच सांगता येईल. आपल्या अभिनयानं बॉलीवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण करणा-या सनी देओल यांचा सोशल मीडियावरही प्रचंड फॉलोअर्स आहे, सध्या ते राजकारणात सक्रिय आहेत. ते एका पक्षाचे आमदारही आहेत. मात्र चित्रपटांपासुन त्यांची नाळ काही तुटलेली नाही. सोमवारी मोठी ऐतिहासिक कामगिरी करुन देशाचे नाव जगभर पोहचवले.
भारत आणि ऑस्ट्रेलियात झालेल्या कसोटीत भारतानं बाजी मारली. अटीतटीच्या सामन्यात भारतानं विजय मिळवून कोट्यवधी भारतीयांना आनंद साजरा करण्यास भाग पाडले. यावेळी सोशल माध्यमांवरही अनेक सेलिब्रेटींनी भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सनी देओल यांनी आपल्या खास अंदाजात भारतीय संघाचे कौतूक केलं आहे. ब्रिस्बेन येथे झालेल्या 4 कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारली आहे. ऋषभ पंत आणि शुभमन गिल हे या सामन्य़ाचे हिरो ठरले.
युपीत 'लव जिहाद' चा तमाशा; हिंदू - मुस्लिमांमध्ये दरी वाढविण्याचा प्रयत्न
भारतानं विजय मिळवल्यानंतर संघावर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला आहे. सनी देओलनं यावेळी व्टिट करुन भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले की, भारतीयांना कधीही कमी समजू नका. दुसरीकडे बॉबी देओल यांनी भारतीय संघाचे कौतूक करताना असे लिहिले आहे की, आम्हाला तुमचा गर्व वाटतो. तुम्ही मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
'कंगणावर चोरीचा आरोप, 1950 च्या अगोदर कसला आला कॉपीराईट'
सनी यांच्या व्टिटलाही मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्याला रिव्टिट करणा-यांची संख्या अधिक आहे. अनेकांनी यावेळी भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. बॉबी देओलनंही आनंद व्यक्त करुन अशाप्रकारच्या ऐतिहासिक क्षणाला साजरे करण्याचा आनंद मिळतो आहे याबाबत समाधान वाटत असल्याचे सांगितले आहे. बॉबी आणि सनी या दोघांच्याही व्टिटला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. भारताला ऑस्ट्रेलियानं 328 धावांचे लक्ष्य दिले होते. त्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची फलंदाजी ढासळु लागली असताना एका बाजूनं शुभमन गिलनं किल्ला लढवला. पुढे त्यावर ऋषभ पंतने विजयाची पताका फडकावली.