'लेक माझी लाडकी' या मालिकेत होतोय नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश

टीम ई सकाळ
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई : अनेक मालिका, चित्रपटांतून लोकप्रिय असलेला अभिनेता आशुतोष कुलकर्णी स्टार प्रवाहच्या 'लेक माझी लाडकी' या मालिकेत दाखल होत आहे. डॉ. ऋषिकेश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा तो साकारणार आहे. त्याच्या या व्यक्तिरेखेमुळे कथानकात नवे गुंते निर्माण होतात, की नात्यांबाबत उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल होते, हे पहाणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
 
 'लेक माझी लाडकी' या मालिकेच्या कथानकात नात्यांचा मोठा गुंता निर्माण झाला आहे. एकीकडे मीरासाठी स्थळं पहिली जात आहेत, साकेत सानिका आणि मीरा यांच्यात अडकला आहेत. तसंच इरावती, आदित्य आणि जयदेव यांच्यातही वेगळा संघर्ष सुरू आहे. या परिस्थितीत फिजिओथेरपिस्ट असलेल्या डॉ. ऋषिकेश धर्माधिकारीचा या कुटुंबात प्रवेश होतो. अपघातात पाय दुखावलेल्या जयदेववर तो उपचार करतो. मात्र, त्याच्या येण्यानं मालिकेच्या कथानकाला वेगळं वळण मिळणार आहे. मात्र, या घरात येण्यामागे डॉ. ऋषिकेशचा काही हेतू आहे का, हे पहाणं रंजक ठरणार आहे. 
  
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: New charector in Lek ladaki Tv entertainment news esakal