esakal | ‘चंद्र आहे साक्षीला’ नव्या मालिकेतून सुबोध सांगणार 'रहस्यमयी गोष्ट'
sakal

बोलून बातमी शोधा

subodh bhave new serial

स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो. आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात.

‘चंद्र आहे साक्षीला’ नव्या मालिकेतून सुबोध सांगणार 'रहस्यमयी गोष्ट'

sakal_logo
By
सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना काहींना मैत्रीत प्रेमं  सापडतं, तर काहींना एका नजरेत, तर काहींची मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. पण, प्रेमाच्या या हळुवार, सुंदर नात्याभोवती जेव्हा विश्वासघाताचं कुंपण येतं तेव्हा माणसाची होरपळ सुरू होते.

‘चंद्र आहे साक्षीला’ ही सुबोध भावेची नवी मालिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. 11 नोव्हेंबरपासून सोम ते शनि रात्री 8.30 वा. कलर्स मराठीवर ही मालिका प्रसारित होणार आहे.  आपल्याच आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीकडून तो झाला आहे याचा जेव्हा संशय येतो तेव्हा कशी ती व्यक्ती स्वत:ला सांभाळते आणि पुढे जाते ? हा प्रश्न समोर येतो. यासगळ्याचा गुंता उलगडवणारी, त्यातील रहस्याचा भेद करणारी एक नवी मालिका  आहे.चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत सुबोधने  श्रीधरची भूमिका साकारली आहे.  स्वातीची भूमिका ऋतुजा बागवे हिने केली आहे.  प्रेम एकदा तरी करून पहावे. असे

म्हटले जाते. मात्र त्या प्रेमातील विश्वासाला तडा गेल्यास दुरावा वाट्याला येतो. सगळा प्रवास एका मृगजळासारखा वाटतो. डोळ्यांना दिसलं तरी समोर जाताच चकवा देणारं, दुरून अतिशय सुंदर तर जवळ गेल्यावर अस्तित्वात नसणारं. अशीच हळुवार प्रेमकहाणी सुरू होते आपल्या स्वाती आणि श्रीधरमध्ये पण यांच्या कथेला रहस्याची किनार आहे. या कथेतील स्वाती मध्यमवर्गीय, अतिशय सोशीक, साधी सरळ. वयाच्या 34 व्या वर्षी देखील स्वाती अविवाहित आहे.  स्वातीच्या आयुष्यात श्रीधर नकळतपणे येतो आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं. जसजसे दिवस पुढे सरकू लागतात एकमेकांवरच प्रेम आणि विश्वास वाढू लागतो. आणि दोघे लग्न करण्याचा निर्णय घेतात.

या मालिकेतील स्वाती आणि श्रीधरची प्रेमकथा काहीशी अशीच आहे... कसा असेल यांचा प्रवास ? असं कोणतं रहस्य आहे ज्याने या दोघांचे आयुष्य बदलून जाणार आहे? या हळुवार प्रेम कहाणीची सुरुवात होणार आहे.आपला जीव ज्या व्यक्तिवर आहे तो खरंच त्या विश्वासाच्या पात्र आहे का ? ज्या व्यक्तीच्या नावावर आपण आपल संपूर्ण आयुष्य करू पाहतो आहे तो आपल्या प्रेमाच्या पात्रतेचा आहे का ? या सगळ्या शंका, प्रश्न त्याक्षणी निरर्थक वाटतात. यासगळ्याशी संबंधित अशा गुढ रहस्यांचा शोध या मालिकेतून घेण्यात आला आहे.