रानबाजार : १८ वर्षांखालील मुलांनी पाहू नये असा प्राजक्ता आणि तेजस्विनीचा बोल्ड सिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tejaswini pandit and prajakta mali new web series on planet marathi

रानबाजार : १८ वर्षांखालील मुलांनी पाहू नये असा प्राजक्ता आणि तेजस्विनीचा बोल्ड सिन

मनोरंजन विश्वात वेब सिरीज या माध्यमाने अनेक बदल घडवून आणले. हे बदल केवळ हिंदीत नाही तर मराठीतही झाले. अनेक दमदार मराठी वेब सिरीज प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी झाल्या. एवढेच नव्हे तर प्लॅनेट मराठी (planet marathi) च्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वाला एक स्वतंत्र ओटीटी वाहिनी मिळाली. प्लँनेट कडून सध्या दर्जेदार चित्रपट निर्मितीहि केली जात आहे. पण नुकतंच त्यांनी एका वेब सिरीजची घोषणा केली. 'रानबाजार' (raanbaazaar) असे या वेब सिरीजचे नाव असून त्याचा टिझर वाऱ्यासारखा पसरत आहे. (planet marathi news web series ranbazar) यामध्ये प्राजक्ता तेजस्विनी पंडीत (tejaswini pandit ) आणि प्राजक्ता माळीचे (prajakta mali) अत्यंत बोल्ड सीन आहेत.

हेही वाचा: माधुरी थिएटरच्या पडद्यावर नाचत होती अन लोक वेड्यासारखे पैसे उडवत होते..

याचे कारणही खास आहे. कारण या टिझरमध्ये अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) चक्क विवस्त्र झाली आहे. (tejaswini pandit in ranbazar) तर प्राजक्ता माळीचा प्रणय प्रसंग करतानाचा सीन आहे. यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणारा 'रानबाजार' अशी ओळख या वेब सिरीजची करुन देण्याच आली आहे.

अभिनेत्री तेजस्विनी पंडित (tejaswini pandit) या आणि प्राजक्ता माळी (prajakta mali) वेब सिरीज मध्ये प्रमुख भूमिकेत आहे. प्लॅनेट मराठीने या वेब सिरीजची निमिर्ती केली असून 'रेगे', 'ठाकरे' असे ज्वलंत, संवेदनशील विषय हाताळणाऱ्या अभिजित पानसे (Abhijit Panse) यांनी दिग्दर्शन केले आहे. ''असच काहीसं घडलं होतं.. कदाचित'' एक वाक्य त्यांनी पोस्टरवर लिहिलं आहे तर टिझर सोबत एक भन्नाट कॅप्शन दिले आहे. ''एकदा लोकांची सेवा करून पाहिली… एकदा प्रेमात त्याग करूनही पाहिला …एकदा बदलाही घेतला ..! आता मात्र फसत चाललीय …. सत्तेच्या जाळ्यात अडकलेल्या एका फुलपाखरासारखी…'' असे हे कॅप्शन आहे. सत्य घटनांवर आधारित या वेब सिरीजमध्ये आजवर कधीही न पाहिलेली गोष्ट पाहायला मिळणार आहे. वेबविश्वाला हादरवून टाकणाऱ्या या 'रानबाजार'चा ट्रेलर १८ मे ला येणार आहे. या टीझरनेच अनेकांची झोप उडवली आहे त्यामुळे ट्रेलरमध्ये काय असेल याकडे सर्वांचे लक्षल लागले आहे.

Web Title: New Marathi Web Series Raanbazaar Teaser Released With Tejaswini Pandit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top