माधुरी थिएटरच्या पडद्यावर नाचत होती अन लोक वेड्यासारखे पैसे उडवत होते.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

madhuri dixit birthday news

माधुरी थिएटरच्या पडद्यावर नाचत होती अन लोक वेड्यासारखे पैसे उडवत होते..

Madhuri dixit birthday : बॉलिवूडमध्ये आजही जीच्या अभिनयाचा आणि नृत्याचा दबदबा आहे अशी माधुरी दीक्षित (madhuri dixit) आजही चाहत्यांना वेड लावते. एका मराठी मुलीने त्यावेळी हिंदीत जाऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली ही बाब आजही अधोरेखित करण्यासारखी आहे. याच धकधक गर्लचा आज वाढदिवस. आज तिच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. कारण माधुरीने केवळ अभिनय केला नाही तर प्रेक्षकांच्या काळजात घर केलं.

हेही वाचा: Shiney Ahuja Birthday : 'त्या' एका चुकीने शायनीचं अख्ख करियर उध्वस्त झालं..

एक वेळ अशी होती की माधुरीला चित्रपटगृहाच्या पडद्यावर पाहूनही लोक पैसे उडवत होते. असाच एक किस्सा आहे तिच्या डान्सचा. 'एक दो तीन' हे गाणं तर तुम्ही ऐकलच असेल. या गाण्याने अक्षरशः लोक पागल झाले होते. तुम्हाला खोट वाटेल पण सिनेमा सुरू असताना प्रेक्षक स्क्रीनवर पैसे उडवायचे. या गोष्टीवर चक्क माधुरीचाही विश्वास बसला नाही. म्हणून माधुरी स्वतः सिनेमागृहात जाऊन बसली. हाच किस्सा माधुरीने स्वतः एका मुलाखतीत सांगितला आहे.

हेही वाचा: किरण माने : आता यांना ठेचून काढायला हवं.. केतकी सारख्या विकृत लोकांनी..

माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांचा 1988 साली रिलीज झालेला 'तेजाब' चित्रपट हा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर हीट ठरलेला चित्रपट. या चित्रपटाचे डिंग डाँग डिंग म्हणजे एक दो तीन.. (EK do tin song in tezaab) हे गाणे आजही अनेकांच्या मनात रुंजी घालत आहे. या गाण्याचे बोल, माधुरीने केलेला डान्स आणि तिची अदा हे विलोभनीय होते. या गाण्यावर प्रेक्षक इतके फिदा होते की चित्रपटात गाणं सुरू होताच लोक खिशातले पैसे काढून स्क्रीनवर उधळायचे. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यावर विश्वास बसला नाही म्हणून माधुरी स्वतः बुरखा घालून चंदन चित्रपटगृहात गेली. चित्रपटात एक दो तीन गाणं सुरू झालं आणि लोक अक्षरशः पैसे उधळू लागले. हे पैसे माधुरीच्या डोक्यावर पडत होते. माधुरी बुरख्यात हे दृश्य पाहून भारावून गेली. हा किस्सा आजही माधुरी आवर्जून सांगते.

Web Title: Madhuri Dixit Shares Memory Of Ek Do Tin Song In Tezaab Movie

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top